ETV Bharat / politics

"इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांबद्दलच्या विधानाचा छगन भुजबळांनी घेतला समाचार - CHHAGAN BHUJBAL ON SOLAPURKAR

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आता सोलापूरकरांच्या या विधानाचा छगन भुजबळांनी समाचार घेतला आहे.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 10:23 PM IST

नाशिक : लोकं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही वक्तव्य कशी करतात. औरंगजेबाकडे देशावर राज्य होते त्यांच्या लोकांना लाच देऊन कसे बाहेर पडू शकते. छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिमत्तेच्या जोरावर आग्र्याहून बाहेर पडले. सोलापूरकरच्या म्हणण्या प्रमाणे ते जर आले असते तर त्यांना शंभुराजेंना दुसऱ्याकडं सोडून येण्याची गरज पडली नसती. इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल पदाची ऑफर नाही : "मला राज्यपाल पदाची ऑफर नाही, मी सामान्य लोकांमध्ये आणि मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर येणाऱ्या संकटात मला पुढे राहून लढावे लागते. जर असे पद घेतले तर मी काहीच बोलू शकणार नाही. राज्यपालपद खूप मोठं पद आहे. पण ते मी जर घेतलं तर मी कुणासाठी बोलू शकणार नाही, भांडू शकणार नाही. त्यापेक्षा मला मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद सर्वांत मोठं आहे" असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ (ETV Bharat Reoprter)

शिंगं गाडली असतील तर ती बाहेर काढा : खासदार संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीच्या येथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांची शिंगं गाडून ठेवलेली आहेत, अशी चर्चा असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले, "ठीक आहे मी काय सांगू शकत नाही. कुठं गाडलेत, ती काढा म्हणावं बाहेर कुणी तरी बाहेर बोललं असेल. मला काही माहिती नाही. मी त्याबाबत अधिक बोलणार नाही".असं म्हणतं त्यांनी विषयाला पूर्णविराम दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती : राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना म्हटलं की, "शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले त्यावेळी पेटारे बिटारे काही नव्हते, चक्क लाच देऊन महाराज आलेत. त्यासाठी किती हुंडा वाटवला त्याचे पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली. मोहसीन खान आणि मोईन खान असं नाव आहे. त्यांच्याकडून अधिकृत शिक्के, परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटी निघाले त्यांच्या परवाण्याची खूण सुद्धा आहे. गोष्टी रूपात करताना मग ते लोकांना जरा रंजक करून सांगाव्या लागतात. रंजकता आली इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो. मग खरा इतिहास लोकांपर्यंत जात नाही असा दावा राहुल सोलापूरकरांनी केला होता".

हेही वाचा -

  1. मुंडे यांच्या राजीनाम्याकरिता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट; छगन भुजबळ म्हणाले,"कुणाची बाजू.."
  2. "...त्यांचे पक्षानं पुष्कळ लाड केलेत", मंत्री माणिकराव कोकाटेंचा छगन भुजबळ यांना घरचा आहेर
  3. छगन भुजबळ नक्की अधिवेशनात सहभागी होतील सुनिल तटकरे यांची माहिती; भुजबळ यांची हजेरी पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.