ETV Bharat / state

'वर्षा' बंगल्यात रेड्यांची शिंगं पुरल्याचा आरोप; संजय राऊतांच्या वेडेपणाचा कळस, संजय शिरसाटांची टीका - SANJAY SHIRSAT ON SANJAY RAUT

संजय राऊतांनी त्यांच्या वेडेपणाचा कळस दाखवण्याचा प्रयत्न केल्याची टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली.यावेळी संजय राऊत नेहमी नशेत असतात का? असा प्रश्न उपस्थित केला.

SANJAY SHIRSAT ON SANJAY RAUT
मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संजय राऊत (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2025, 10:50 PM IST

Updated : Feb 5, 2025, 10:36 AM IST

मुंबई : संजय राऊतांनी त्यांच्या वेडेपणाचा कळस दाखवण्याचा प्रयत्न केल्याची टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. राऊत नेहमी नशेत असतात का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गुवाहाटीला गेल्यावर त्यांनी आम्हाला रेडे संबोधून टीका केली होती. रेडे, बळी, काळी जादू हे विषय त्यांच्या डोक्यातून जात नाही. वेडेपणाचे सर्व प्रकार केवळ राऊत करु शकतात. आला अंगावर तर घेतला शिंगांवर ही आमची भूमिका आहे असा इशारा त्यांनी राऊतांना दिला. धर्माचा, देव देवतांचा तुम्ही अपमान केला. त्यामुळं ना घरका ना घाटका अशी तुमची अवस्था झाल्याची टीका त्यांनी केली. असे वक्तव्य करुन राऊत अंधश्रध्दा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. उबाठाची पूर्ण वाट राऊतांनी लावली. उबाठाला बुडवण्याचा महामेरु राऊत आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानात रेड्यांची शिंगे कुठं पुरली आहेत?, ती जागा दाखवा, आपण दोघं जावून शोधू असं आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांना दिलं.

माध्यमांशी बोलताना कृष्णा हेगडे (ETV Bharat)

आदित्य ठाकरेंना झोपडीधारकांचा पुळका : आदित्य ठाकरेंना झोपडीधारकांचा पुळका येतोय हे मोठे आश्चर्य असल्याची टीका त्यांनी केली. अदानी त्यांना भेटलं नाही असं त्यांचं द्योतक आहे. धारावीच्या नावाखाली अदानीकडून कमिशन मागणारे लोक आता झोपडीधारकांच्या बाजूनं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. बांगलादेशी इथं घुसतात आणि दहशतवादी कृत्य करतात, असा दावा त्यांनी केला.

फडणवीस मार्ग काढत बसले असतील : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात गुवाहाटी येथील बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगे पुरल्याचा खळबळजनक खासदार संजय राऊत यांनी केला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी काहीतरी करुन ठेवलं असेल आणि ते फडणवीसांना कळाल असेल आणि त्यावर ते काहीतरी मार्ग काढत बसले असतील, अशी चर्चा शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होणे ही शरमेची बाब आहे, अशी टीका केली होती.

त्यांना जास्त अनुभव : या आरोपावर बोलताना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "काळ्या जादू बाबत त्यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळं त्यांनाच त्याची माहिती विचारा. त्यांच्या बोलण्यावर जास्त बोलण्याची गरज नाही." उध्दव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि एकनाथ शिंदे बंगल्यात गेले तेव्हा काही मिरच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टोपल्या भरुन सापडले होते. तसेच खूप लिंबूही सापडले होते असा आरोप गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केला.

संजय राऊत स्वताच महत्व कमी करत आहेत : "संजय राऊत अंधश्रद्धेवर वक्तव्य करून स्वतःचं महत्त्व कमी करत आहेत" असं शिवसेनेचे नेते माजी आमदार कृष्णा हेगडे म्हणाले. अंधश्रद्धेविरोधी कायदा असलेल्या राज्यात असे बेताल वक्तव्य करणे योग्य नाही असे ते म्हणाले. हेगडे यांनी शिवसेना उबाठा चे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. संजय राऊत अंधश्रद्धेविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी योग्य नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यात राऊत यांनी केलेले बेताल वक्तव्य अयोग्य आहे. राऊत मोठे नेते आहेत पण, अशा प्रकारच्या गोष्टी बोलून स्वतःचं महत्त्व कमी करत आहेत. त्यांनी आता कुठेतरी थांबण्याची गरज आहे, असं मत कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केलं.

हा काय वेड्यांचा बाजार आहे का?- संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला. ते म्हणाले," माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षावर राहायला जाऊ! म्हणून मी वर्षा बंगल्यात राहायला गेलेलो नाही. माझ्या मुलीची परीक्षा झाल्यानंतर त्या बंगल्यात राहायला आम्ही जाणार आहोत." याबाबत सातत्यानं सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. "खरे तर आपल्या स्तरावरील माणसानं उत्तर देऊ नये, अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत," असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्षा बंगला पाडण्याबाबतच्या कथित वृत्तावर मुख्यमंत्री म्हणाले, "हा काय वेड्यांचा बाजार आहे का? वर्षा कोणाच्या घरची मालमत्ता आहे का ?"असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

  1. "दमानिया ताईंवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार"; धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले
  2. "इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांबद्दलच्या विधानाचा छगन भुजबळांनी घेतला समाचार
  3. इतर राज्यात किंवा जिल्ह्यात राहूनही मतदानाचा हक्क कसा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Last Updated : Feb 5, 2025, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.