ETV Bharat / bharat

पुण्याहून महाकुंभ मेळाव्याला जाताना कारचा मध्य प्रदेशात अपघात, तिघांचा मृत्यू - PUNE FAMILY ACCIDENT IN JABALPUR

कुंभमेळ्याला जाणाऱ्या पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता जबलपूरमध्ये घडला.

Pune family accident in Jabalpur
पुण्यातील कुुटंबाचा जबलपूरमधील कार अपघातात मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 10:01 AM IST

जबलपूर: उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या (Pune family accident in Jabalpur) एकाच कुटुंबातील तिघांचा मध्य प्रदेशामधील जबलपूरमधील रस्ते अपघातात मृत्यू झाला. हे कुटुंब पुण्यातील रहिवाशी होते.

पुणे येथील पटेल कुटुंब जबलपूर मार्गे प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात ( Mahakumbh Mela 2025) सहभागी होण्यासाठी त्यांच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून होते. भरधाव वेगातील त्यांच्या इनोव्हा कारनं जबलपूर जिल्ह्यातील पुलाला धडक दिली. यावेळी कारमधील चारपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जबलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बर्गी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश चौरिया म्हणाले, "कालादेही गावाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील प्रवाशांना नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविलं. डॉक्टरांनी तीन जणांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये विनोद पटेल, नीरू पटेल आणि शिल्पा पटेल यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत महाकुंभ मेळाव्याला जाणारे नरेश पटेल या नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे".

पुण्यातील कुुटंबाचा जबलपूरमधील कार अपघातात मृत्यू (Source- ETV Bharat Reporter)
  • मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जीव गमावलेले विनोद पटेल आणि शिल्पा पटेल हे पती-पत्नी होते. तर दुसरी मृत महिला ही जखमी झालेल्या नरेश पटेल यांची पत्नी होती. तिघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना कळविली आहे.

हेही वाचा-

  1. पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
  2. जळगाव रेल्वे अपघातानं जागवल्या मुंबई अपघाताच्या स्मृती; महिलांच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं घेतला 49 महिलांचा बळी
  3. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग, आगीत 20 ते 25 तंबू जळून खाक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.