महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फार्मसीच्या विद्यार्थिनीला मित्रानं नेलं लॉजवर; तिघांनी केला सामूहिक बलात्कार, तेलंगाणात खळबळ - Gang Rape On Girl By Friends - GANG RAPE ON GIRL BY FRIENDS

Gang Rape On Girl By Friends : फार्मसी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या मित्रानं इतर साथिदारांसह सामूहिक बलात्कार केला. ही घटना वारंगलमधील इंतेजरगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

Gang Rape On Girl By Friends
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 1:54 PM IST

हैदराबाद Gang Rape On Girl By Friends : फार्मसी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिच्या मित्रानं लॉजवर नेऊन सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना वारंगलमधील इंतेजरगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली. याबाबत इंतेजरगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवकुमार यांनी, "ही तरुणी एका खासगी फार्मसी महाविद्यालयात शिकत असून तिच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. तिच्या मित्रानं तिला कारमधून लॉजवर नेऊन सामूहिक अत्याचार केला," अशी माहिती दिली.

जबरदस्तीनं कारमध्ये बसवून नेलं लॉजवर :वारंगल इथल्या एका खासगी फार्मसी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणारी ही तरुणी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. 15 नोव्हेंबरला तिच्या ओळखीच्या भूपालपल्ली इथल्या तरुणानं तिच्या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यानं तिला महत्वाचं बोलायचं असल्याचं सांगून कारमध्ये बसण्यास सांगितलं. कारमध्ये अगोदरचं तीन तरुण होते. यावेळी तरुणीनं कारमध्ये बसण्यास नकार दिला. यावेळी नराधमानं जबरदस्तीनं तिला कारमध्ये बसण्यास भाग पाडून कार शहरातील भाजी मंडईजवळच्या एका लॉजवर नेली. या लॉजवर या तिघांनी तरुणीवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं दिली.

दारू पिऊन तिघांनी तरुणीवर केला बलात्कार :या तरुणीला कारमधून लॉजवर नेऊन या तरुणांनी दारू पिऊन बलात्कार केला. यामुळे ही तरुणी प्रचंड हादरली. पीडितेची परीक्षा सुरू असल्यानं तिनं सुरुवातीला तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर सुट्टीत घरी परतल्यानंतर तिनं ही घटना आईला सांगितली. घटनेची माहिती मिळताच तिच्या आईला जबर हादरा बसला. तिची आई तिला वारंगल पोलीस आयुक्तांकडं घेऊन गेली. यावेळी वारंगल पोलीस आयुक्तांनी त्यांना तक्रार करण्याची सूचना दिली.

पोलिसांनी ठोकल्या नराधमांना बेड्या :मंगळवारी इंतेजरगंज पोलीस ठाण्यात पीडितेनं तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. पोलिसांनी पुराव्यासाठी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजचा धांडोळा घेतला. लॉज व्यवस्थापनाकडून घेतलेल्या आधारकार्डच्या आधारे भूपालपल्ली इथल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी पीडितेच्या मित्रासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तिसऱ्या नराधमाचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील पीडितेला पुढील चौकशीसाठी भरोसा केंद्रात हलवण्यात आलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. बीड हादरलं! वसतिगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल - Minor Girl Molested
  2. सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; तरुणीला भेटायला बोलवून चार जणांचा अत्याचार - Young Girl Sexually Assault
  3. घरात घुसून हातपाय बांधून विवाहितेवर बलात्कार, मिरा-भाईंदरमधील धक्कादायक घटना, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Mira Bhayandar Rape Case

ABOUT THE AUTHOR

...view details