पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या आता 73 वर (guillain barre syndrome patients) पोहोचली आहे. मागील दोन दिवसांमध्ये वाढती रुग्णसंख्या आणि या आजारावर लागणारा खर्च लक्षात घेता पुणेकरांनी या आजारावर मोफत उपचार केले जावे (guillain barre syndrome patients free treatment), अशी मागणी केली होती. ती मागणी आता मान्य करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार? : अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस ग्राउंड येथे राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गुलेन बॅरी सिंड्रोमसंदर्भात विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी सांगितलं की, "या आजाराबाबत नागरिकांनी मला दहा लाखांचं बिल दाखवलं. ते मी महापालिका आयुक्तांना दाखवलंय. त्यानंतर आता या आजाराबाबत असा निर्णय घेण्यात आलाय की, पिंपरी चिंचवड येथील रुग्णांना वायसीएम रुग्णालयात, तर पुणे शहरातील रुग्णांना कमला नेहरू रुग्णालय येथे मोफत उपचार देण्यात येणार आहे." तसंच उद्या मुंबईत गेल्यावर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पुण्यातील ससून हॉस्पिटल इथं मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.
शरद पवारांविषयी काय म्हणाले अजित पवार? : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळं त्यांना डॉक्टरांनी चार दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "व्हीएसआयच्या बैठकीतदेखील साहेबांची तब्येत थोडीशी खराब होती. साहेब मुंबईला गेले आहेत. डॉक्टरांनी त्यांना चार दिवसांची विश्रांती घ्यायला सांगितलंय."
हेही वाचा -