छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या शिवसेना दुसऱ्या शिवसेनेला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी राज्यात 'मिशन टायगर' राबवण्यात येत असल्याचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आहेत. पुढील काही दिवसात ठाकरेंच्या शिनसेनेचे अनेकजन पक्षप्रवेश घेणार असल्याची माहिती, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली होती. "पैसे देऊन गद्दार विकत घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र काही फरक पडणार नाही. 40 जण गेल्यावर जे व्हायचं ते झालं तर आता काही होणार नाही," अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
राज्यात 'मिशन टायगर' : राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, आमदार, नगरसेवक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी जोर लावला जात आहे. यासाठी 'मिशन टायगर' हा शब्द वापरला जातोय. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडं घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर अनेकजण स्वतः पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ही मिशन नवीन नसून जुनीच आहे आणि ते सुरूच राहणार आहे. पुढील आठ दिवसात अनेक आजी, माजी नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा देखील शिरसाट यांनी केलाय.
गद्दार घेऊन पक्ष वाढत नाही : "पक्ष वाढवणं ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि ती सुरूच राहते. 'मिशन टायगर' किंवा इतर नाव देऊन काही होत नाही. अशा गद्दरांना पैसे देऊन सोबत घेण्याचा प्रकार करून कोणताही पक्ष मोठा होत नसतो. त्यांना जर गद्दार लोक प्रलोभन, खोके देऊन लागत असतील तर त्यांना शुभेच्छा," असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. "याला आम्ही घाबरत नाही, चाळीस गेल्यावर जो परिणाम झाला तो झाला, आता काही होत नाही," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
हेही वाचा -