मुंबई - भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन आज 26 जानेवारी रोजी साजरा करत आहे. हा दिवस सर्वांसाठी खूप विशेष आहे, आजचा सुट्टीचा दिवस तुम्ही आणखीच खास बनवू शकता. तुम्ही घरी बसूनओटीटीवर हे पाच देशभक्तीपर चित्रपट पाहून आपले मनोरंजन करू शकता. ओटीटीवर रोमान्स आणि अॅक्शन चित्रपटांव्यतिरिक्त देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आहेत. आज आम्ही अशा चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जे पाहून तुम्हाला भारतीय असण्याचा गर्व होईल.
बॉर्डर : या प्रजासत्ताक दिनी तुम्ही सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना जॅकी श्रॉफ आणि पूजा भट्ट स्टारर 'बॉर्डर' हा चित्रपट पाहू शकता. 1997मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
उरी: द सर्जिकल स्ट्राईक : 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटात मेजर विहान सिंग शेरगिलची कहाणी आहे, जी काश्मीरमधील उरी येथील एका तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाविरुद्ध गुप्त कारवाईचे नेतृत्व करतात. 'उरी' चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल, मोहित रैना आणि कीर्ती कुल्हारी यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
सॅम बहादूर : प्रजासत्ताक दिन खास बनवण्यासाठी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. 'सॅम बहादूर' ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर उपलब्ध आहे.
फायटर : हा चित्रपट गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भारतीय वायुसेना पाकिस्तानी सैन्याकडून बालाकोट स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेत असताना दाखविण्यात आलं आहे. 'फायटर'मध्ये हृतिक रोशन दीपिका पदुकोण, अनिल कपूर, आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
मिशन मजनू : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत तुम्ही 'मिशन मजनू' हा चित्रपट पाहू आपले मनोरंजन करू शकता. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, एक रॉ एजंट पाकिस्तानमध्ये घुसतो आणि देशाला सावध करतो, यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.