मुंबई - बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोर धरत आहेत. परंतु यावर दोन्ही बाजूंकडून कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही. दरम्यान, गोविंदाचा वकील आणि व्यवस्थापकानं खुलासा केला आहे की, सुनीताने ६ महिन्यांपूर्वी गोविंदापासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
सुनीताचा यांनी ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज - अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदाच्या वकिलानं खुलासा केला की सुनीतानं ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण नंतर परिस्थिती सुधारली आणि त्यांच्यात समझोता झाला. गोविंदाचा वकील म्हणाला की, "आम्ही नवीन वर्षात नेपाळला गेलो होतो. तिथं त्यांनी पशुपतिनाथ मंदिरात पूजाही केली. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे, प्रत्येक जोडप्याला लहान-मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्यातही ते घडलं, पण आता ते हे सर्व सोडून पुढे गेले आहेत."
वकील बिंदल यांनीही गोविंदा आणि त्याची पत्नी वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात हे नाकारलं. त्यांनी सांगितलं की, "खासदार झाल्यानंतर गोविंदानं त्यांच्या घरासमोरच एक बंगला खरेदी केला होता. ते कधीकधी बंगल्यात मिटींगसाठी उपस्थित राहतात आणि तिथंच झोपतात पण सुनीता आणि गोविंदा दोघेही एकत्र राहतात, वेगळे राहत नाहीत."
सुनीता मुळे अफवा पसरली का? - आयएएनएसशी बोलताना गोविंदाच्या मॅनेजरने खुलासा केला की सुनीतानं घटस्फोटाच्या अफवा पब्लिसिटी स्टंट म्हणून पसरवल्या. गोविंदा हा खूप साधा माणूस आहे आणि तो त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मॅनेजरनं पुढं सांगितलं की, "हो, सुनीताने कोर्टाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे पण ती कशाबद्दल आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही. तसेच, ही सूचना अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही." मॅनेजरने सांगितले की, "सुनीता गेल्या काही दिवसांपासून गोविंदाबद्दल विचित्र गोष्टी बोलत आहे, ज्यामुळे ही बातमी अधिक प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी सांगितलं होतं की तिनंच गोविंदाला नृत्य शिकवलं होतं. गोविंदा बहुतेक वेळ बंगल्यात राहतो आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतो."
गोविंदानं १९८७ मध्ये सुनीता आहुजाशी लग्न केले आणि पुढच्याच वर्षी त्यांना टीना ही मुलगी झाली. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांना हर्षवर्धन हा मुलगा झाला.
हेही वाचा -
- राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात 'गेट आऊट' मोहीम सुरू, जनतेच्या चिंता दूर करण्यात अपयश आल्याची टीका
- रवींद्र नाट्य मंदिराचं रुपडं पालटलं, २८ फेब्रुवारी रोजी होणार उद्घाटन, रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन
- बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या आनंदावर विरजण पडतं तेव्हा... ‘आगीतून फुफाट्यात’ पडलेल्या मित्रांची गोष्ट