ETV Bharat / entertainment

तमिळ सुपरस्टार विजयचा शेवटचा चित्रपट 'थलापती 69'चे शीर्षकसह फर्स्ट लूक रिलीज... - THALAPATHY 69 TITLE AND FIRST LOOK

तमिळ सुपरस्टार विजयचा शेवटचा चित्रपट 'थलापती 69'चे शीर्षक आणि फर्स्ट लूक समोर आले आहे.

vijay
विजय (थलापती विजय (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 26, 2025, 1:40 PM IST

मुंबई : चित्रपटांमधून राजकारणात प्रवेश केलेल्या तमिळ सुपरस्टार 'थलापथी' विजयच्या शेवटच्या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, चाहते शीर्षक आणि विजयच्या चित्रपटातील फर्स्ट लूकसह प्रत्येक अपडेटची वाट पाहत आहेत. विजयचा शेवटचा चित्रपट 'थलापती 69' आहे. आज 26 जानेवारी रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि विजयचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. केव्हीएन प्रॉडक्शननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विजयच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर आता त्याचे चाहते खुश झाले आहेत. यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

'थलापती 69'चे शीर्षक जाहीर : साऊथ स्टार विजयचा शेवटच्या चित्रपटाचे नाव 'जन नायगन' आहे. हा चित्रपट राजकारणाशी संबंधित आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं 'आपण त्यांना 'जन नायगन' म्हणू शकतो, 'थलापती 69'चा फर्स्ट लूक.' या चित्रपटानंतर विजय चित्रपटसृष्टीला निरोप देईल आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल. विजयच्या राजकीय पक्षाचं नाव तमिलगा वैत्री कझगम आहे. तसेच चित्रपटसृष्टी सोडण्याच्या बातमीवर विजयनं त्याच्या पहिल्या राजकीय सभेत म्हटलं होतं, "मी माझे हिट करिअर आणि मोठा पगार सोडून तुमच्याकडे आलो आहे, मी लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे."

'जन नायगन' चित्रपट कधी प्रदर्शित होईल? : थलापती विजय स्टारर 'जन नायगन' चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, विजयनं या चित्रपटासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 275 कोटी रुपये फी घेतली आहे. दरम्यान विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं, 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' चित्रपटामध्ये काम केलं आहे. जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचं दिग्दर्शन वेंकट प्रभू यांनी केलं होतं. हा चित्रपट विजयच्या चाहत्यांना खूप आवडला होता. दरम्यान 'जन नायगन' या चित्रपटामध्ये चाहत्यांना विजयचा अनोखा अवतार दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा आता केली जात आहे.

हेही वाचा :

  1. 'बेबी जॉन' थलपथी विजयच्या 'थेरी'ला मागे टाकण्यात ठरला अपयशी, जाणून घ्या किती केली कमाई
  2. थलपती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाचा मराठीमध्ये होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
  3. रजनीकांत, चिरंजीवी, कमल हासनला जे झेपलं नाही ते 'राजकारण' करुन दाखवणार का थलपती विजय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.