लेकींचं लग्न पाहायचंय! आजारी वडिलांच्या सांगण्यावरून आयसीयू वॉर्डमध्ये पार अनोखा निकाह - Nikah In ICU Ward - NIKAH IN ICU WARD
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jun 16, 2024, 12:01 PM IST
लखनौ Nikah In ICU Ward : उत्तर प्रदेशमधील इरा मेडिकल कॉलेजमध्ये एक अनोखा विवाह पार पडला. येथे दाखल झालेल्या एका बापानं आपल्या दोन मुलींचा आयसीयूमध्ये निकाह केला. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि परिचारिका या खास क्षणाचे साक्षीदार ठरले. केवळ मौलाना आणि कुटुंबातील काही सदस्यांना आयसीयूमध्ये जाण्याची परवानगी होती. मुस्लिम रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नाची सध्या संपूर्ण शहरात चर्चा आहे. शहरातील सय्यद मोहम्मद जुनैद इक्बाल (वय 51) हे उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर उपचारासाठी हरदोई रोडवर असलेल्या इरा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचं लग्न आधीच निश्चित केलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन मेडिकल कॉलेज प्रशासन त्यांना लग्नासाठी घरीही जाऊ देत नव्हते. अशा परिस्थितीत जुनैद इक्बाल खूप चिंतेत होते. त्यांनी ओटी प्रभारी डॉ. मुस्तहसीन यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलींच्या लग्नाची काळजी वाटत होती. त्याच्या हयातीत त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलींचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. यानंतर ओटी तंत्रज्ञांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एमएम ए फरीदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आपली नैतिक जबाबदारी समजून डॉक्टरांनी प्रोटोकॉलनुसार मुलींच्या लग्नाला आयसीयूमध्ये परवानगी दिली.