सिंधुदुर्ग : भारत पाकिस्तान सामन्यानंतर देशविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारवाल्या दाम्पत्याला प्रशासनानं चांगलीच अद्दल घडवली. या भंगारवाल्यानं भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी या भंगारवाल्या व्यावसायिकाविरोधात संताप व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील आडवण इथल्या परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकाम प्रशासनानं जेसीबीनं जमीनदोस्त केलं. नागरिकांनीही त्याला उत्स्फूर्त पाठिंबा देत या कारवाईचं स्वागत केलं.
मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 24, 2025
कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला.
मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस… pic.twitter.com/LK1yDPuLa6
आमदार निलेश राणे यांनी केली कारवाईची मागणी : भंगारवाल्या व्यावसायिकानं पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्याकडं धाव घेत तक्रार केली. सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. या पत्राची दखल घेत नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण इथं परप्रांतीय भंगार व्यावसायिकांनी केलेलं अनधिकृतपणे अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली. प्रशासनानं हे अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा केला. त्यामुळे प्रशासनानं अतिक्रमणावर केलेल्या या बुलडोझर कारवाईचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
मी मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचे अभिनंदन करतो. मालवण मधील वकिलांनी भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आरोपी मुसलमानासाठी वकीलपत्र न देण्याचा निर्णय घेतला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 24, 2025
देशभरात हे उदाहरण गाजलं पाहिजे, परत एकदा मनापासून आभार 🙏🏻
देशविरोधी भूमिका घेतल्यास खपवून घेणार नाही : भंगारवाल्यावर कारवाई करण्यात आल्यानं नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, "अशाप्रकारे जर कोणी देशद्रोही भूमिका घेत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊ. अशी अनधिकृत सर्व बांधकामं तत्काळ हटवावी अशी भूमिका शिवसनेची राहणार आहे," असं सामंत यांनी सांगितलं. "देशविरोधी भूमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे," असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Solapur Balloons: ईदगाह मैदानासमोर पाकिस्तान समर्थनार्थ फुग्यांची विक्री; मुस्लिमांना बदनाम करण्याचे कारस्थान एमआयएमचा आरोप
- एनआयएची भिवंडीसह अमरावतीत कारवाई, दोन संशयित तरुणांची चौकशी सुरू
- "अरे ओवैसी, कुत्ता भी ना पे** करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तिरंगा लहरायेगा पाकिस्तान पर"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार