मुंबई : 90च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षितला 'धकधक गर्ल' म्हणून ओखळतात. ती भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. तसेच चित्रपटसृष्टीत माधुरी दीक्षितला डान्सर म्हणून ओळखले जाते. माधुरीनं अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. माधुरी अनेक दमदार डान्स हा अनेकांना आवडतो. वयाच्या 57व्या वर्षी देखील ती खूप सुंदर डान्स करते. माधुरीला लहापणापासूनच डान्स करण्याची आवड होती. याबद्दल तिनं अनेकदा मुलाखतीत सांगितलं आहे. स्टेजवर माधुरी जेव्हा पण डान्स करण्यासाठी उतरते, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडेच असतात.
माधुरी दीक्षितचा व्हिडिओ व्हायरल : 'दिल तो पागल है' या चित्रपटामध्ये तिनं करिश्माबरोबर डान्स करून प्रेक्षकांचं मनं जिंकली होती. यानंतर तिनं 'देवदास' चित्रपटात ऐश्वर्याबरोबर 'डोला रे डोला रे' या गाण्यात डान्स केला होता. या दोघींचे नृत्य अनेकांना पसंत पडले होते. आता नुकतेच तिनं 'भूल भुलैय्या' चित्रपटात विद्या बालनबरोबर डान्स केला. हा डान्स खूप गाजला होता. आजही व्यग्र शेड्युमधून वेळ मिळाल्यावर माधुरी आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. माधुरीच्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
माधुरी दीक्षितच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस : माधुरी दीक्षितनं व्हिडीओत रेट्रो लूक केला आहे. या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. तिनं लता मंगेशकरचं गाणं 'उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये'वर सुंदर डान्स करून चाहत्यांना खुश केलंय. या व्हिडिओत डान्स करताना माधुरीच्या चेहऱ्यावर सुंदर हावभाव असल्याचे दिसत आहेत. आता माधुरीनं या पोस्टमध्ये कॅप्शन, 'रेट्रो वाइब्स फॉर द विन' असं दिलंय. माधुरीच्या या व्हिडिओला तब्बल 28 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, 'सुंदर डान्स.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'सुपर सुपर सुपर स्टार 'आणखी एकानं लिहिलं, 'धकधक गर्ल खूप छान डान्स, सुंदर दिसत आहे.'
हेही वाचा :