ETV Bharat / entertainment

प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंड वृषांक खनालबरोबर करणार लग्न, हळदी समारंभातील फोटो व्हायरल... - PRAJAKTA KOLI WEDDING

प्राजक्ता कोळी आज 25 फेब्रुवारी रोजी नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनालबरोबर लग्न करणार आहे. आता तिच्या हळदी समारंभामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Prajakta Koli
प्राजक्ता कोळी (Prajakta Koli Photo - ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 25, 2025, 10:53 AM IST

Updated : Feb 25, 2025, 11:56 AM IST

मुंबई - प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती आज 25 फेब्रुवारी वृषांक खनालबरोबर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हे जोडपे गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. आज, 25 फेब्रुवारी रोजी ते लग्न करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्राजक्ता कोळीनं 23 फेब्रुवारी रोजी तिच्या मेहंदी समारंभातील फोटो शेअर करून लग्नाच्या बातमीची पुष्टी केली. आता तिनं हळदी समारंभाची एक झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. याशिवाय यापूर्वी तिच्या डान्सचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान हळदी समारंभामधील फोटोत प्राजक्ता आणि तिचा होणार पती खूप आनंदी असल्याचे दिसत आहेत.

प्राजक्ता वृषांक खनालच्या हळदी समारंभातील फोटो : हळदीच्या दिवशी प्राजक्तानं ऑफ-व्हाइट शरारा परिधान केला आहे. यावर तिनं सुंदर कानातले आणि नेकलेस घातला. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय तिनं आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या मित्र-मंडळी आणि पतीबरोबर पार्टी करताना दिसत आहे. तसेच हळदीपूर्वी तिनं आपल्या चाहत्यांबरोबर मेंहदी समारंभातील फोटो शेअर केले होते. या कार्यक्रमात तिनं अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला हिरवा लेंहगा सेट घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता कोळी कर्जतमध्ये लग्न करणार आहे. प्राजक्ताच्या लग्नात वरुण धवन, बादशाह, विद्या बालन आणि रफ्तार सारखे अनेक स्टार्स हजेरी लावू शकतात. आता प्राजक्ताचे चाहते तिच्या लग्नासाठी खूप आतुर आहेत.

प्राजक्ता आणि वृषांकबद्दल : प्राजक्ता कोळीचं मोस्टली सेन या नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. तसेत तिची 'मिसमॅच्ड' वेब सीरीज अनेकांना आवडली होती. या सीरीजमध्ये तिनं डिंपल आहुजाची भूमिका साकरली होती. या सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी व्यतिरिक्त रोहित सराफविद्या माळवदे, तारुक रैना, अभिनव शर्मा, रणविजय सिन्हा, एहसास चन्ना, मुस्कान जाफरी, दिपन्निता शर्मा, लॉरेन रॉबिन्सन, अक्षत सिंह हे स्टार्स दिसले आहेत. ही सीरीज तिची खूप लोकप्रिय झाली होती. दुसरीकडे वृषांकबद्दल सांगायचं झालं तर तो काठमांडू, नेपाळचा असून एक वकील आहे.

हेही वाचा :

  1. युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो व्हायरल, पाहा पोस्ट
  2. 'मिसमॅच्ड' फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळी करणार नेपाळी बॉयफ्रेंडशी लग्न, जाणून घ्या तारीख...

Last Updated : Feb 25, 2025, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.