हरारे ZIM vs IRE 3rd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 25 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळं वाया गेल्यानंतर, झिम्बाब्वेनं दुसऱ्या T20 सामन्यात शानदार पुनरागमन केलं आणि तीन विकेट्सनं विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता आयर्लंड मालिका बरोबरीत आणण्यासाठी उत्सुक असेल, तर झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानावर अनेक दिवसांनी मालिका विजय मिळवायचा प्रयत्न असेल.
Zimbabwe win the second T20I by 3 wickets, to take a 1-0 lead in the 3-match series#ZIMvIRE #Travel&ExperienceZimbabwe 📝:https://t.co/WMPbswUAu0 pic.twitter.com/KzvrIK3QNQ
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 23, 2025
दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा विजय : पहिला T20 सामना पावसात गेल्यानंतर हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेनं आयर्लंडचा 3 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह यजमान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघानं 62 धावांत 4 विकेट गमावल्या. तथापि, टोनी मुनयोंगानं एका टोकालानं नाबाद 43 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. रायन बर्लनं 27 धावांचं योगदान दिलं तर सिकंदर रझानं 22 धावांचं योगदान दिलं. झिम्बाब्वेनं 19.2 षटकांत 141 धावा करुन सामना जिंकला.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : झिम्बाब्वे आणि आयर्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 17 T20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये झिम्बाब्वेनं 8 वेळा विजय मिळवला आहे, तर आयर्लंडनंही 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला.
Close, but...congrats to Zimbabwe.
— Cricket Ireland (@cricketireland) February 23, 2025
SCORE: https://t.co/sHRWZDV4jQ#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/3jF6TaGOIY
हरारेची खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर अलिकडेच चांगले सामने खेळले गेले आहेत. या मैदानाची खेळपट्टी चढ-उतार होते. सुरुवातीला, नवीन चेंडूनं वेगवान गोलंदाज घातक ठरले आहेत. पण असे फलंदाज आहेत जे स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करु शकतात. खेळपट्टी थोडी मंद आहे, ज्यामुळं चेंडू अधिक फिरतो. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करत विरोधी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल.
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील तिसरा T20I सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील तिसरा T20I सामना आज 25 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता खेळला जाईल. याची नाणेफेक रात्री 09:30 वाजता होईल.
NEWS 📡
— Cricket Ireland (@cricketireland) February 24, 2025
Josh Little signs with Middlesex Cricket. He will play for the club during the 2025 season when his international and Irish domestic commitments allow.
Story 🔗 https://t.co/mwUiC0bWVz#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/xX2i0n6tEn
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील तिसरा T20I सामना कुठं आणि कसा पाहायचा?
झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाणार नाही. मात्र आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे तिसरा T20I सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे : क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, जॉनाथन कॅम्पबेल, बेन करन, ट्रेवर ग्वांडू, वेस्ली माधेवरे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाड्झा, न्याशा मायावो, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामुरी, सिकंदर रझा, शॉन विल्यम्स.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅव्हिन होई, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, अँड्र्यू मॅकब्राइन, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, मॉर्गन टॉपिंग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
हेही वाचा :