संत एकनाथ षष्ठीची समाप्ती सोहळा संपन्न - Eknath Shashthi 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 10:19 PM IST

thumbnail

छत्रपती संभाजीनगर Eknath Shashthi 2024 : संतांची नगरी अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात नाथ षष्ठीची परंपरा शेकडो वर्षांपासून आजही कायम आहे. आज पैठण येथे एकनाथ षष्ठीला दहीहंडी फोडून प्रसाद स्वरूपात काल्याचे वाटप करण्यात आले. संत एकनाथ समाधी (Eknath Shasthi) मंदिर हजारो वारकरी भाविकांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं भक्तिमय झालं होतं. यावेळी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. 

म्हणून हा दिवस साजरा करतात : फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली होती. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला एकनाथ षष्ठी असं संबोधलं जातं. यावर्षी 425 वर्ष या मोहोत्सवला झाले आहेत. या दिवशी पाच घटना घडल्यानं त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. एकनाथ महाराज याच्या गुरुंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत पुढे नाथांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्यानं श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.