नवी दिल्ली Quantum and 6G technologies : क्वांटम तंत्रज्ञानात भारताचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स (TCoE) इंडिया आणि विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (VRIF) यांच्यात करण्यात आला. हा ऐतिहासिक सामंजस्य करार क्वांटम तंत्रज्ञान, संबंधित 5-G/6-G तंत्रज्ञान इत्यादी आणि R&D च्या इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन करण्यासाठी आहे. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाऊंडेशन (VRIF) चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्दिष्ट या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीला गती देण्याचं आहे.
संशोधन आणि नवोपक्रमाला चालना : सेंटर ऑफ एक्सलन्स हे हब-अँड-स्पोक मॉडेलवर डिझाइन केलेलं आहे. ज्यामध्ये विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (VRIF) आणि टेलीकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स (TCoE) इंडिया हे केंद्रीय केंद्र म्हणून काम करत आहेत. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) च्या 228 संलग्न महाविद्यालयांच्या बौद्धिक, पायाभूत सुविधांचा उपयोग करून, सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन विकासामध्ये एक प्रमुख सुत्रधार म्हणून काम करेल. या मॉडेलद्वारे, सेंटर ऑफ एक्सलन्स क्वांटम आणि संबंधित 5-जी/6-जी तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक संशोधन करेल.
संशोधकांना होणार फायदा : हे सेंटर ऑफ एक्सलन्स दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र (TEC), इंडिया 6-जी अलायन्स, टेलिकॉम स्टँडर्ड्स डेव्हलपमेंट कमिटी ऑफ इंडिया (TSDSI), शैक्षणिक नेटवर्क आणि स्टार्टअप इकोसिस्टम यांसारख्या दूरसंचार मानकीकरणामध्ये काम करणाऱ्या प्रमुख संस्थांमधील समन्वय वाढवेल. हे सेंटर ऑफ एक्सलन्स 4 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2 हजारांपेक्षा जास्त पीएचडी नवकल्पनांचं व्यापारीकरण करण्यासाठी सक्षम करेल.
अनेक मान्यवर उपस्थित : या करारावर विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) चे कुलगुरू डॉ. विद्या शंकर एस, विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाऊंडेशनचे (VRIF) उपमहासंचालक विनोद कुमार, (SRI), DoT आणि संचालक, Telecom Center of Excellence (TCoE) यांनी सामंजस्य करार स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभाला कार्यकारी परिषदेचे 200 हून अधिक प्रतिनिधी, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) च्या 228 महाविद्यालयांचे डीन विभागप्रमुख आणि दूरसंचार विभागाचे (DoT) इतर तज्ञ उपस्थित होते.
हे वाचलंत का :