हैदराबाद : Realme P3 Pro 5G, आणि Realme P3x 5G भारतात लाँच झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे. Realme P3 Pro 5G स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 चिपसेटवर चालतो, तर Realme P3x 5G मध्ये अलीकडेच लाँच झालेला MediaTek Dimensity 6400 SoC प्रोसेसर आहे. दोन्ही हँडसेट अँड्रॉइड 15 वर चालतात, तसंच कंपनीचा Realme UI 6.0 वापरकर्ता इंटरफेस देखील यात दिलेला आहे.
Packed with Snapdragon 7s Gen 3 & 6000mAh battery.
— realme (@realmeIndia) February 18, 2025
Get ready to SLAY with the #realmeP3Pro5G!
First sale on 25th Feb, 12 PM! Starting at ₹21,999* inclusive of 2K off bank offer
*T&C Apply
Search for #realmeP3Pro5G on @Flipkart!https://t.co/p9FT51E3kshttps://t.co/fTFutAU0Im pic.twitter.com/AiksiffCxu
Realme P3 Pro 5G किंमत
Realme P3 Pro 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते. हा हँडसेट 8GB+256GB आणि 12GB+256GB व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे ज्यांची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये आणि 26,999 रुपये आहे. हा हँडसेट गॅलेक्सी पर्पल, नेब्युला ग्लो आणि सॅटर्न ब्राउन रंगात येतो. 25 फेब्रुवारीपासून कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर हा फोन विक्रिसाठी उपलब्ध होईल.
With world’s 1st MediaTek Dimensity 6400 chipset + 6000 mAh battery, #realmeP3x5G is HERE & it is #BornToSlay
— realme (@realmeIndia) February 18, 2025
1st sale: 28th Feb, 12 PM
Starting @ ₹12,999* inclusive of 1K off with bank offer
*T&C Apply
Head to @Flipkart:https://t.co/7H13Gt0bZVhttps://t.co/9bnAYZI1Cw pic.twitter.com/R8uRX4HTEA
Realme P3x 5G किंमत
दुसरीकडं, Realme P3x 5G ची किंमत 6GB+128GB आणि 8GB+128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी 13,999 रुपये आणि 14,999 रुपये आहे. 28 फेब्रुवारी रोजी देशात Realme वेबसाइट आणि Flipkart द्वारे या फोनचा सेल सुरू होईल. हा फोन तीन रंगांमध्ये लूनर सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि स्टेलर पिंकमध्ये खरेदी करता येईल. ग्राहकांना Realme P3 Pro 5G खरेदी करताना 2000 रुपयांची सूट आणि Realme P3x 5G वर 1,000 रुपयांची सूट निवडक कार्डवर मिळू शकते.
Realme P3 Pro 5G, Realme P3x 5G स्पेसिफिकेशन
Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन्ही ड्युअल सिम हँडसेट आहेत, जे Realme UI 6.0 वर चालतात. दोन्ही फोन Android 15 वर आधारित आहे. पहिला हँडसेट स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 द्वारे समर्थित आहे, जो 12GB पर्यंत RAM सह येतो, तर दुसरा डायमेन्सिटी 6400 चिप आणि 8GB RAMसह येतो.
क्वाड-कर्व्ह AMOLED स्क्रीन
कंपनीनं Realme P3 Pro 5G मध्ये 6.83-इंच 1.5K (1,472x2,800 पिक्सेल) क्वाड-कर्व्ह AMOLED स्क्रीन दिली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 450ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. दरम्यान, Realme P3x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच LCD स्क्रीन आहे. फोटो आणि व्हिडिओंसाठी, Realme P3 Pro 5G मध्ये सोनी IMX896 सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. समोर, हँडसेटमध्ये सोनी IMX480 सेन्सरसह 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा
Realme P3x 5G मध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G मध्ये तुम्हाला अनुक्रमे 256GB आणि 128GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळतं. हे हँडसेट 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth आणि GPS कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात. तसंच USB Type-C पोर्टला देखील सपोर्ट करतात.
6,000mAh बॅटरी
Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G दोन्हीमध्ये 6,000mAh बॅटरी आहे. हे फोन अनुक्रमे 80W आणि 45W वर चार्ज केल्या जाऊ शकतात. या हँडसेटमध्ये 'मिलिटरी ग्रेड' शॉक रेझिस्टन्स आणि धूळ आणि पाण्याच्या रेझिस्टन्ससाठी IP68+IP69 रेटिंग आहेत. Realme ने P3 Pro 5G मध्ये काही AI फीचर्स देखील दिले आहेत. ज्यामध्ये AI Best Face, AI Erase 2.0, AI Motion Deblur आणि AI Reflection Remover यांचा समावेश आहे.
हे वाचलंत का :