मुंबई : अमेरिकन हिंदी भाषेतील 'अनुजा' हा लघुपट 5 फेब्रुवारी 2025 पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या लघुपटाला सर्व स्तरातील प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. हा लघुपट 2025च्या आगामी ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे. 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं लघुपटासाठी निर्माती म्हणून काम केलं आहे. दरम्यान काही तासांपूर्वी 'देसी गर्ल'नं तिच्या लघुपटाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तिनं आता सोशल मीडियावर 'अनुजा'चं कौतुक केलं आहे. 18 फेब्रुवारी रोजी, प्रियांकानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'अनुजा'चं पोस्टर शेअर केले आहे. अॅडम जे. ग्रेव्हज दिग्दर्शित 'अनुजा' हा लघुपट एक 9 वर्षांची प्रतिभावान मुलगी आणि तिच्या मोठ्या बहिणीच्या संघर्षाबद्दल कथा सांगतो.
प्रियांका चोप्रानं केली 'अनुजा'चं कौतुक : तसेच प्रियांका चोप्रानं आपल्या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अनुजा ऑस्करच्या शर्यतीत आहे, मी तुम्हाला नेटफ्लिक्सवर हा अद्भुत चित्रपट पाहण्याची जोरदार शिफारस करते.' याची कहाणी गरिबीतून बाहेर पडण्यासाठी समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणींशी झुंज देणाऱ्या बहिणी 'अनुजा'त पाहाता येतील. या लघुपटाचा प्रीमियर 17 ऑगस्ट 2024 रोजी हॉलीशॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. 'अनुजा'ची निर्मिती गुनीत मोंगा, मिंडी कलिंग, सुचित्रा मत्ताई आणि अनेकांनी केली आहे. तसेच प्रियांका तिच्या पर्पल पेबल पिक्चर्स बॅनरखाली कार्यकारी निर्माती म्हणून टीममध्ये सामील झाली होती.
'अनुजा' चित्रपटाची स्टार कास्ट : यात सजदा पठाण, नागेश भोसले, गुलशन वालिया आणि अनन्या शानबाग यांनी मुख्य भूमिकेत काम केलं आहे. 'अनुजा'चा रन टाईम 22 मिनिटे आहे. 22 मिनिटांच्या या लघुपटात अशी कहाणी दाखविण्यात आली आहे, की जी तुम्हाला भावुक करून टाकेल. ऑस्कर नामांकित इंडो-अमेरिकन 'अनुजा'ला 97व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट श्रेणीसाठी नामांकन मिळालं आहे. आता हा चित्रपट ऑस्कर अवार्ड जिंकणार की नाही हे काही दिवसांत समजेल. 'अनुजा' ऑस्कर विजेता ठरणार अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत.
हेही वाचा :