ETV Bharat / sports

ऋषभ पंतनं लाईव्ह सामन्यात रोहित आणि सिराजची मागितली माफी, चेन्नई कसोटीदरम्यान नेमकं काय घडलं? - Rishabh Pant Apologises - RISHABH PANT APOLOGISES

Rishabh Pant Apologises : चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 376 धावांवर संपला. त्यानंतर बांगलादेशी संघ फलंदाजीला त्यानंतर चौथ्या षटकात असं काही घडलं ज्यासाठी ऋषभ पंतला मोहम्मद सिराजसह कर्णधार रोहित शर्माची माफी मागावी लागली.

Rishabh Pant Apologises
Rishabh Pant Apologises (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 20, 2024, 4:49 PM IST

चेन्नई Rishabh Pant Apologises : कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक ऋषभ पंतनं 632 दिवसांनी पुनरागमन केलं. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या भारतीय संघाच्या स्टार यष्टीरक्षक-फलंदाजानं याच संघाविरुद्ध पुनरागमन केलं. पंतचं पुनरागमन आतापर्यंत चांगलंच झालं आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं संकटात सापडलेल्या भारतीय संघाला सांभाळून घेतलं. मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा एक निर्णय चुकीचा ठरला, त्यामुळं त्याला सामन्याच्या मध्यावर माफी मागावी लागली. त्यानं भारतीय संघाचा त्याचा सहकारी मोहम्मद सिराज आणि कर्णधार रोहित शर्माची माफी मागितली.

नेमकं काय घडलं : वास्तविक शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या डावाच्या सुरुवातीला ही घटना घडली. मोहम्मद सिराज डावाच्या चौथ्या षटकात गोलंदाजी करत होता. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या पाचव्या चेंडूवर डावखुरा फलंदाज झाकीर हसनविरुद्ध एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील केलं. सिराज बांगलादेशी फलंदाज बाद आहे असं गृहीत धरत होता आणि आवाहनासोबतच आनंद साजरा करत होता पण तसं झालं नाही. अंपायरनं त्याला आऊट दिलं नाही, ज्यामुळं सिराजसह भारतीय संघाचे बाकीचे खेळाडूही आश्चर्यचकित झाले.

पंतनं दिला नकार : यानंतर भारतीय संघाकडे पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेण्याचा एक पर्याय होता. जेणेकरुन रिव्ह्यूमध्ये खरं स्पष्ट होईल. यासाठी सिराज कर्णधार रोहित शर्माची समजूत काढताना दिसला, पण रोहितनं त्याचं ऐकलं नाही. विकेटकीपर पंतनं त्याला असं करण्यापासून रोखल्यामुळं हे घडलं. पंत म्हणत होता की चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात होता, त्यामुळं तो बाद होणार नाही आणि रिव्ह्यूही खराब होईल. अखेर रोहितनं रिव्ह्यू घेतला नाही. काही वेळातच स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला, ज्यात चेंडू लेग स्टंपला लागला असता आणि झाकीर बाद झाला असता हे स्पष्ट झालं.

पुन्हा मागावी लागली माफी : हे घडताच सिराजनं लगेचच पंतचं लक्ष याकडं वेधलं. हे पाहून पंतनंही आपली चूक मान्य करुन मैदानावर सिराजची माफी मागितली. मात्र झाकीर हसन फार काळ टिकला नाही आणि अवघ्या 4 षटकांनंतर तो आकाश दीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या डावात भारताच्या 376 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 149 धावांत संपुष्टात आला आणि भारताला 227 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

हेही वाचा :

  1. IND vs BAN: भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज चारीमुंड्या चीत; भारताकडे भक्कम आघाडी - Chennai TEST DAY 2
  2. लाईव्ह क्रिकेट सामन्यात मैदानावरच खेळाडूंमध्ये जोरदार भांडण, लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण; पाहा व्हिडिओ - Fighting in Live Cricket Match

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.