उपराजधानीत गणेश विसर्जनाची धूम, 'नागपूरच्या राजा'ला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी - Nagpur Ganesh Visarjan - NAGPUR GANESH VISARJAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 17, 2024, 7:22 PM IST
नागपूर Nagpur Ganesh Visarjan : दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं साकडं घालत बाप्पाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झालाय. नागपूरचा राजा गणपती मंडळाचा गणपती नागपुरातील मानाचा गणपतीचा आहे. सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या नागपूरचा राजाच्या मूर्तीनं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. नागपूरच्या राजाची मिरवणूक राजेशाही थाटात काढण्यात आली. यंदा नागपूर शहरात एकूण 1 हजार 212 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाची स्थापना केली. त्यापैकी 457 सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन आज होत आहे. चार फुटापेक्षा जास्त मोठ्या मूर्तींचं विसर्जन कोराडी तलाव या ठिकाणी केलं जाणार आहे. कोलार आणि कन्हान नदीमध्येही 4 फुटापेक्षा जास्त मोठ्या मूर्तींचं विसर्जन करता येणार आहे. 4 फुटापेक्षा छोट्या मूर्तींचं विसर्जन शहरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात (टॅंक) करता येईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. गणपती विसर्जनसाठी 5 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत.