वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या; अजित पवारांनी नाव न घेता संजय गायकवाडांना फटकारलं - Ajit Pawar Slams Sanjay Gaikwad - AJIT PAWAR SLAMS SANJAY GAIKWAD
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 20, 2024, 9:00 AM IST
बुलडाणा Ajit Pawar Slams Sanjay Gaikwad : वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि घटक पक्षांना अडचणीत आणू नये, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बुलडाणा इथं व्यक्त करुन नाव न घेता आमदार संजय गायकवाड यांना फटकारलं. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करत 11 लाखांचं बक्षीस जाहीर करण्याचं बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद उफाळून आला. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त करुन इशारा दिला. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बुलडाण्यात दाखल झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे. कुठलाही सत्ताधारी, विरोधी आणि कुठलाही पक्ष असो वाचाळवीरांनी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मर्यादा पाळाव्या. कुठंही वेडंवाकडं विधान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा घटक पक्षांना अडचणीत आणू नये ! राग व्यक्त करण्यासाठी भाषा कशी असली पाहिजेत ? याचा दाखला देत अजित पवार म्हणाले की भाषा अशी वापरली पाहिजे की उद्याला कोणी टीका करायला नको. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे शोभत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असायला हवा ? हे शिकवलं आहे. त्यामुळे अशा विचारांचं महायुतीचं सरकार आहे," असंही अजित पवार पवार यावेळी म्हणाले.