दहशतवादी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्यात येणार; उज्ज्वल निकम यांची माहिती - TERRORIST TAHAWWUR RANA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2025, 8:06 PM IST

जळगाव : मुंबई हल्ल्याचा दहशतवादी तहव्वूर राणाची याचिका फेटाळण्यात आल्यामुळं, राणाला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. 26/11 च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणाला (Terrorist Tahawwur Rana) अमेरिकेनं ग्रीन सिग्नल दिला आहे. अमेरिकेच्या कोर्टात भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, यूएस कोर्टानं राणाला भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार भारतात पाठवण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर आता राणाला भारतात परत आणलं जाणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली.

2009 मध्ये अटक करण्यात आली होती : 2009 मध्ये राणाला अमेरिकेतील शिकागो शहरातून अटक करण्यात आली होती. एफबीआयने पाकिस्तान समर्थित नेटवर्कचा भाग असल्याच्या आरोपावरून हल्ल्याच्या एका वर्षानंतर त्याला पकडण्यात आलं. राणावर आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.