ETV Bharat / state

मला जो निर्णय घ्यायचा तो मी घेतला आहे, योग्य वेळ आली की सांगेन; मंत्रिपदाबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया - CHHAGAN BHUJBAL ON MINISTERIAL POST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 7:13 PM IST

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर अनेक दिवसांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळलं. मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. यावर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम : महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना याबाबत छगन भुजबळ म्हणाले, "मी काही निर्णय घेतला असेल तुम्हाला का सांगेन, मी नाराज आहे हे रोज तुमच्यासमोर ओरडून सांगू का? परवा रात्री मी आलो आहे आणि फुले यांच्या कार्यक्रमात बिझी आहे. मला काही घाई नाही मला जो निर्णय घ्यायचा तो मी घेतला आहे. योग्य वेळेला मी तो सांगेन". तर नायगाव येथे मोठ्या प्रमाणावर आज कार्यक्रम झाले, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ (ETV Bharat Reporter)

बीडच्या घटनेबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील : बीडमधील घटनेबाबत भुजबळ म्हणाले, "मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. तपासात काय मिळतंय त्यावर अवलंबून आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात अली आहे. हे ऐकल्यावर अंगावर काटे उभे राहात आहेत. अशा राक्षसांना फाशी शिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही". तसंच बीडचे पालकमंत्री कोण होईल याबद्दल मला काही माहिती नाही असं यावेळी भुजबळ म्हणाले. विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत आहेत. याबाबत भुजबळ म्हणाले, मला काही माहिती नाही. मी बाहेर होतो.

हेही वाचा -

  1. "आठ ते दहा दिवसात आपण पुन्हा भेटू आणि...", देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या भेटीत मोठी खलबतं ?
  2. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकी चर्चा काय?
  3. "भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तर महायुतीविरोधात...", ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.