नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी - DAGDUSHETH GANPATI TEMPLE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 1, 2025, 10:22 PM IST
पुणे : आजपासून नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. या नवीन वर्षाची सुरूवात पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने केली. आज पहाटे पासूनच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. तर मंदिरात आणि मंदिराबाहेर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ही सजावट सरपाले बंधू यांनी केली होती. आज पहाटे ३ वाजताच मंदिर प्रशासनाकडून मंदिर उघडण्यात आलं होतं. भाविकांसाठी विशेष अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक हे दर्शनासाठी उपस्थित होते. आमच्या नवीन वर्षाची सुरूवात ही बाप्पाच्या दर्शनाने व्हावी आणि सगळ्यांना नवीन वर्ष सुख, समृध्दी आणि समाधानच जावं अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली.