गॉल SL VS AUS 2nd Test day 3 Live : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 6 फेब्रुवारीपासून खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॉल येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. यासह, पाहुण्या संघानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Alex Carey reflects on his superb hundred, the " blueprint" laid down by steve smith, and the state of the second #SLvAUS Test pic.twitter.com/hQSf0KaDgR
— cricket.com.au (@cricketcomau) February 7, 2025
कांगारु मजबूत स्थितीत : या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर ऑस्ट्रेलियन संघानं 80 षटकांत तीन गडी गमावून 330 धावा केल्या. मात्र पहिल्या डावातील फलंदाजीची त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे दोन आघाडीचे फलंदाज केवळ 37 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतले. परंतू यानंतर, उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून डावाची जबाबदारी घेतली. परिणामी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघानं 73 धावांची आघाडी घेतली असून अद्याप त्यांच्या 7 विकेट शिल्लक आहेत.
An absolute masterclass in batting against spin.
— cricket.com.au (@cricketcomau) February 7, 2025
Full wrap from day two of the second #SLvAUS Test: https://t.co/JEVmOAdRTz pic.twitter.com/6GnxP0RbmH
कॅरी-स्मिथची नाबाद भागिदारी : ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीनं सर्वाधिक 139 धावा केल्या. अॅलेक्स कॅरी व्यतिरिक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 120 धावा केल्या. हे दोघंही सध्या नाबाद आहेत. आता आजच्या दिवशी या दोघांची नजर आपापल्या द्विशतकावर आसेल. या दोघांशिवाय, ट्रॅव्हिस हेड 21 धावा, उस्मान ख्वाजा 36 धावा आणि मार्नस लाबुशेन 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, निशान पेरीसने श्रीलंकेच्या संघाला पहिलं यश मिळवून दिलं. श्रीलंकेकडून निशान पेरिसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. निशान पेरीस व्यतिरिक्त प्रभात जयसूर्यानं एक विकेट घेतली.
👑👑👑 #SLvAUS pic.twitter.com/PHnrdRxnrV
— cricket.com.au (@cricketcomau) February 7, 2025
श्रीलंकेचा पहिला डाव : तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 23 धावांवर बसला. श्रीलंकेकडून दिनेश चंडिमलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. दिनेश चांदीमल व्यतिरिक्त कुसल मेंडिसनं 59 धावा केल्या. कुसल मेंडिस सध्या नाबाद 59 धावांसह खेळत आहे. दुसरीकडे, स्टार गोलंदाज नाथन लायननं ऑस्ट्रेलियन संघाला पहिलं मोठं यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नॅथन लायन आणि मिशेल स्टार्क व्यतिरिक्त मॅथ्यू कुहनेमननं दोन विकेट घेतल्या.
Unbeaten centuries from Steve Smith and Alex Carey handed Australia the advantage over Sri Lanka 🔥#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kEWQP pic.twitter.com/l1kvVHDvmW
— ICC (@ICC) February 7, 2025
खेळपट्टी कशी असेल : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी खूप काही आहे. सामना जसजसा पुढं जाईल तसतसे ते हळूहळू खराब होत जाईल. खेळाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मैदानावरुन काही मदत मिळण्याची अपेक्षा आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पहिल्या कसोटी सामन्यातही फिरकीपटूंनी अनेक विकेट्स घेतल्या.
Steve Smith and Alex Carey put Australia in the driving seat as second day’s play comes to an end in Galle 💪#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kEWQP pic.twitter.com/9U88ovSAwV
— ICC (@ICC) February 7, 2025
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ कधी आणि कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ 08 फेब्रुवारी (शनिवार) रोजी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॉल इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता सुरु होईल.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ कुठं आणि कसा पहायचा?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचं थेट प्रक्षेपण भारतातील टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. तथापि, चाहते फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोश इंगलिस, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन
श्रीलंका : पथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, लाहिरू कुमारा
हेही वाचा :