नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल (Delhi Assembly Election results 2025) आज जाहीर होणार आहेत. दिल्लीतील ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. आप पुन्हा सत्ता स्थापन करणार का? की २७ वर्षानंतर भाजपा दिल्लीचे तख्त मिळणार? हे आज निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
#WATCH | BJP candidate from New Delhi assembly constituency, Parvesh Verma offers prayers at Hanuman Temple, Connaught Place ahead of #DelhiElectionResults
— ANI (@ANI) February 8, 2025
Arvind Kejriwal is the AAP candidate for the seat whereas Congress fielded Sandeep Dikshit from the New Delhi seat pic.twitter.com/umx7LJN555
Live updates
#WATCH | AAP candidate from Greater Kailash seat, Saurabh Bharadwaj says, " arvind kejriwal will become the cm for the fourth time... the exit polls will be proven wrong as aap is going to form the govt this time as well..." pic.twitter.com/wQRShQhRY4
— ANI (@ANI) February 8, 2025
- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकरिता मतमोजणी सुरू आहे.
- ग्रेटर कैलाश मतदारसंघातील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोल चुकीचे ठरून आपचे सरकार दिल्लीत स्थापन होईल, असेही आपचे नेते भारद्वाज यांनी म्हटलं.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येणार असल्यानं उमदेवरांची धाकधूक वाढली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार परवेश वर्मा यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात प्रार्थना केली. अरविंद केजरीवाल हे या जागेसाठी आपचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसनं संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
#WATCH | Delhi: A young supporter of AAP National Convenor Arvind Kejriwal, Avyan Tomar reached the residence of Arvind Kejriwal dressed up as him to show support. pic.twitter.com/dF7Vevy6En
— ANI (@ANI) February 8, 2025
दिल्लीत १९ ठिकाणी विधानसभा मतदानाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीपूर्वी मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मतमोजणी केंद्राला चार थरांची सुरक्षा पुरविली आहे. दक्षिण जिल्हा निवडणूक अधिकारी एम. चैतन्य प्रसाद (आयएएस) यांनी मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेचा शुक्रवारी आढावा घेतला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
- बुधवार जाहीर झालेल्या बहुतेक एक्झिट पोलमनुसार भाजपाला आपपेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार आहे. मात्र, आप नेत्यांनी पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
- P-MARQ एक्झिट पोलनुसार, भाजपाला ३९-४९ विधानसभा जागा, आपला २१-३१ जागा आणि काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याची शक्यता आहे.
- दिल्लीत ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दिल्लीत एकूण ६०.५४ टक्के मतदान झाले.
- नवी दिल्लीतील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे काँग्रेस नेते संदीप दीक्षित आणि भाजपचे परवेश वर्मा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
- दिल्लीत सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.
- दिल्लीतील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आपनं बहुमतानं सत्ता स्थापन केली.
- मॅट्रिजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भाजपाला ३५-४० जागा, आपला ३२-३७ जागा आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
- दिल्ली विधानसभा निवडणुकीत यमुना नदीचे प्रदूषण आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नुतनीकरणावरून भाजपानं आपवर निशाणा साधला होता. गेल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण आपनं दिल्लीत चांगल्या शिक्षणाच्या सुविधा पुरविल्याचा दावा केला.
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आप हे दोन्ही घटक पक्ष यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच असल्याचं दिसून आलं.
हेही वाचा-