लाहोर PAK vs NZ 1st ODI Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाकिस्तान वनडे तिरंगी मालिकेचा पहिला सामना 08 फेब्रुवारी (शनिवार) लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही त्रिकोणी मालिका खूप महत्त्वाची ठरेल. या मालिकेत, तिन्ही संघ पाकिस्तानच्या कठीण परिस्थितीत आपली तयारी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरतील.
New Zealand train at the LCCA Ground ahead of the ODI tri-series opener against Pakistan tomorrow at Gaddafi Stadium 🏏#3Nations1Trophy | #PAKvNZ pic.twitter.com/wOyTgGb95p
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 7, 2025
मागील काळातील कामगिरी कशी : अलिकडेच, 'रेनबो नेशन' मध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका झाली होती. ज्यात पाकिस्ताननं मालिका 3-0 नं क्लीन स्वीप केली. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेला परदेशात पराभूत केलं आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरात हरवून नेत्रदीपक विजय मिळवला. यावेळी दक्षिण आफ्रिकेचं लक्ष्य पराभवाचा बदला घेण्याचे असेल. त्याच वेळी, न्यूझीलंडनं अलीकडेच श्रीलंकेला 2-1 असं हरवून आत्मविश्वास वाढवला आहे. या मालिकेत ते आपली कामगिरी कायम ठेवण्यास सज्ज आहे.
Souvenir shopping with the captains ©️✨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 7, 2025
Rizwan leads the way as Santner and Bavuma explore the best finds!#3Nations1Trophy pic.twitter.com/MeAPEvDWxD
हेड-टू-हेड सामने : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 116 वनडे सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडनं 51 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननं 61 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने निकालाविना राहिले आणि 1 सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघांमधील ही स्पर्धा नेहमीच रोमांचक राहिली आहे, ज्यात पाकिस्ताननं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
Captains with the VGO TEL Mobile presents @ABLpk Tri-Nation Series trophy! 🏆©️
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 7, 2025
The stage is set for the ODI battle 🤩#3Nations1Trophy pic.twitter.com/KfwIixKwce
लाहोरची खेळपट्टी कशी असेल : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी मालिकेतील पहिला सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. गद्दाफी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अधिक मदत करणारी दिसेल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारच कमी मदत मिळेल, तर संथ पृष्ठभागामुळं फिरकी गोलंदाज त्यांचं कौशल्य दाखवू शकतात. संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते, त्यामुळं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.
The ODI Tri-Series gets underway today against the hosts Pakistan in Lahore! Watch play LIVE from 10pm NZT via the Sports Central Official YouTube channel | https://t.co/wWpjR7ilQq 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1Y3Sm or the NZC app 📲 #3Nations1Trophy #CricketNation pic.twitter.com/QC4ntN7ioU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 8, 2025
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाकिस्तान वनडे तिरंगी मालिकेचा पहिला सामना 08 फेब्रुवारी (शनिवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 02:30 वाजता लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
It all starts tomorrow in Lahore! Watch the ODI Tri-Series against Pakistan and South Africa LIVE on the Sports Central Official YouTube channel | https://t.co/wWpjR7ilQq 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1Y3Sm or the NZC app 📲 #CricketNation pic.twitter.com/hrzcWZt88Y
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 7, 2025
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे पाकिस्तान ट्राय-सिरीज 2025 चं अधिकृत प्रसारण भागीदार आहे. भारतातील चाहते सोनी स्पोर्ट्स टेन 5 वाहिनीवर ही मालिका लाईव्ह पाहू शकतात. याशिवाय, ऑनलाइन पाहण्यासाठी सोनीलिव्ह अॅप आणि वेबसाइटवर स्ट्रीमिंग देखील उपलब्ध असेल.
A look at the Tri-Series prize 🏆🤩🏏#WozaNawe #BePartOfIt pic.twitter.com/1vAqJeQ7J9
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 7, 2025
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
हेही वाचा :