ETV Bharat / bharat

ठाणे ज्वेलर्स दिनेश चौधरी खून प्रकरणातील फरार आरोपी सोनूला उत्तर प्रदेशातून अटक - ARRESTED ABSCONDING ACCUSED SONU

उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून ठाण्यातील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील सेल्समन दिनेश चौधरी खून प्रकरणातील फरार आरोपी सोनूला एसटीएफने अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 7:50 PM IST

कौशांबी (उत्तर प्रदेश) : प्रयागराज एसटीएफ आणि महाराष्ट्र पोलिसांनी हत्येतील फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपी शशांक मिश्रा उर्फ ​​सोनू हा ठाण्यातील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या मालकाला लुटण्याच्या उद्देशाने सेल्समनचा खून करून फरार झाला होता. त्याचवेळी हत्येतील त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

एसटीएफचे उपअधीक्षक शैलेश प्रताप सिंह यांनी सांगितलं की, महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरण; शहापूर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा, हा मांझनपूरचा रहिवासी आहे. त्यानं कौशांबी जिल्ह्यातील त्याच्या इतर साथीदारांसह शाहपूर, ठाणे, येथे असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे सेल्समन दिनेश चौधरी यांना लुटले. 21 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर सोनू व्यतिरिक्त अंकित यादव उर्फ ​​शिंटू रा. महामदपूर आणि फैजान, राहणार सिरियाकला हे तिघेही पळून गेले.

आरोपीची ओळख पटल्यानंतर ठाणे पोलिसांनी एसटीएफच्या पथकासह गुरुवारी दुपारी ४ वाजता मांढनपूर येथे छापा टाकून सोनूला अटक केली. या हत्येतील आरोपी अंकित यादव आणि फैजान अजूनही फरार आहेत. सोनूने चौकशीदरम्यान सांगितलं की, फैजानने दरोड्याची योजना आखली होती आणि जानेवारी 2024 पासून ज्वेलरी व्यावसायिकाचा शोध सुरू होता. आरोपी सोनूवर मांझनपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी अर्धा डझनवर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिनेशकुमार नेहमीप्रमाणे दुकान मालकासह शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दुकानात बंद करून निघाले होते. या दुकानाचे मालक आणि २ कामगार त्यामध्ये दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी चौधरीवर गोळीबार केला होता. यात चौधरी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आलं होतं. मात्र (रविवार) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा...

महालक्ष्मी ज्वेलर्स गोळीबार प्रकरण; शहापूर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.