ETV Bharat / technology

टाटा हॅरियर, सफारी स्टील्थ एडिशन भारतात लाँच, पहिल्यांदाच मॅट ब्लॅक कलरचा पर्याय - HARRIER AND SAFARI STEALTH EDITION

टाटा हॅरियर, सफारी स्टील्थ एडिशन भारतात लाँच करण्यात आली आहे. या एसयूव्ही आता ड्युअल स्क्रीन आणि लेव्हल-2 एडीएएस सारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येतात.

Tata Harrier and Safari Stealth Edition
टाटा हॅरियर, सफारी स्टील्थ एडिशन (Tata)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 13, 2025, 12:15 PM IST

हैदराबाद : टाटा हॅरियर, सफारी स्टील्थ एडिशननं भारतीय एसयूव्ही बाजारात एन्ट्री केली आहे. 2025 च्या भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, त्यांना लॉंच करण्यात आलं आहे. हॅरियर फियरलेस प्लस व्हेरिएंटवर आधारित आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये खरेदी करता येते. विशेष म्हणजे ही टाटाची पहिली एसयूव्ही आहे, जी मॅट ब्लॅक पेंट स्कीममध्ये सादर करण्यात आली आहे. टाटाच्या या सर्वात सुरक्षित एसयूव्हीला पहिल्यांदाच मॅट ब्लॅक कलरचा पर्याय मिळाला आहे.

टाटा हॅरियर, सफारी स्टील्थ एडिशनची वैशिष्ट्ये
पहिल्यांदाच, टाटानं हॅरियरसाठी मॅट पेंट वापरला आहे, ज्यामुळं ही एसयूव्ही आणखी स्टायलिश दिसते. यात 19 इंच ऑल-ब्लॅक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. ज्यामुळं स्टील्थ एडिशनला आणखी चांगला लूक मिळतोय. वैशिष्ट्ये आणि सुरक्षिततेच्या बाबतीत, स्टेल्थ एडिशनमध्ये हॅरियर आणि सफारीच्या डार्क एडिशनमध्ये समान फीचर आहेत.

फुल-ब्लॅक इंटीरियर
टाटा हॅरियर स्टील्थ एडिशन एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये काळ्या लेदर अपहोल्स्ट्रीचा वापर करण्यात आला आहे, जो तिला खूप प्रीमियम फील देतो.

टॉप-लेव्हल फीचर्स
टाटा हॅरियर स्टील्थ एडिशन व्हेरिएंटमध्ये काही उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत. त्यात ड्युअल डिजिटल स्क्रीन, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट आणि लेव्हल-2 एडीएएस (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सारखी अद्भुत वैशिष्ट्ये आहेत.

इंजिन परफॉर्मन्स
टाटा हॅरियर स्टील्थ एडिशनच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर, त्यात समान 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 168 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही आवृत्ती 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ट्रान्समिशन पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. याशिवाय, टाटा लवकरच हॅरियर ईव्ही देखील लाँच करणार आहे. त्यात स्टील्थ एडिशन व्हेरियंट देखील दिसेल. जर तुम्ही स्टाइल, परफॉर्मन्स आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज बोल्ड आणि आक्रमक एसयूव्ही शोधत असाल, तर टाटा हॅरियर स्टील्थ एडिशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.

हे वाचलंत का :

  1. मार्चमध्ये भारतात व्होल्वो XC90 फेसलिफ्ट लाँच होणार
  2. ह्युंदाई ऑरा कॉर्पोरेट एडिशन लाँच, पेट्रोलसह सीएनजी इंजनचा पर्याय
  3. लाँच होण्यापूर्वीच फोक्सवॅगनच्या एंट्री लेव्हल ईव्हीचा टीजर जारी, कार प्रगत जर्मन तंत्रज्ञानानं सुसज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.