Watching Reels At Night Side Effect: आजकाल लोकांचा सर्वात जास्त वेळ हा मोबाईल फोनध्ये जातो. सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असणे जणू गरजेचं झालं आहे. या मोबाईलमध्ये सोशल मीडिया रिल्स पाहणे, गेम खेळणे, मित्र-मैत्रिणींशी चॅट करणे, तसंच युट्युब शॉर्ट व्हिडिओ पाहात बसण्यात अनेक जण तासणतास घालवतात. विशेषत: कॉलेजमधील युवा पिढीला मोबाईलचे व्यसन जडले आहे. रात्रीच्या वेळी अंथरुणावर झोपण्याऐवजी हाच प्रपंच सुरू असतो. ज्यामुळे अभ्यास, घरातील कामे आणि इतर महत्वाच्या गोष्टीसुद्धा बाजुला पडतात. रील्स बघणे विरंगुळ्याचं नवं माध्यम असलं तरी यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं तज्ञांच म्हणणं आहे.
- अभ्यासानुसार
अलीकडच्या काळात चीनमधील जवळजवळ 4,000 लोकांवर एक अभ्यास करण्यात आलाय. त्यात असं आढळून आलं की, तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये रात्री रील्स पाहण्याच्या समवयीमुळे उच्च रक्तदाब होतो. बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या "झोपण्याच्या वेळी लहान व्हिडिओ पाहण्यात घालवलेला स्क्रीन टाईम आणि तरुण आणि मध्यमवयीन लोकांमध्ये आवश्यक उच्च रक्तदाब यांच्यातील संबंध: एक क्रॉस-सेक्शनल अभ्यास" या संशोधनात हे उघड झालं आहे.
बरेच लोक, एकटे असोत किंवा कुटुंबासह. रील्स पाहणं जणून त्यांचा नित्यनियम झाला आहे. रात्रीच्या वेळी कम्युटर-लॅपटॉवर काम करणारे आणि टीव्ही पाहण्यापेक्षा मोबाईल फोनवर रील पाहणारे लोक जास्त आहेत. मात्र, तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, रील्स पहाणे दिवसेंदिवस एक व्यसन बनत चालले आहे. तज्ञांनी हे सुद्धा सांगितले आहे की, रात्रीच्यावेळी फोन उपलब्ध नसला अशावेळी रील्स पाहू न शकल्यामुळे लोकांमध्ये नैराश्याची समस्या निर्माण होत आहे.
तज्ञ म्हणतात की, रील्सचा जीवनशैलीवर विशेष प्रभाव पडतो. यामुळे, ते त्यांच्या भावनांवरील नियंत्रण गमावतात आणि त्यांचे जीवन ते व्यक्त करत असलेल्या आशयानुसार जगण्याची अपेक्षा करतात. सोशल मीडिया कंटेंटचा प्रभाव कधीकधी लोकांना आनंदी करतो, तर कधीकधी तो तणाव आणि चिंता निर्माण करतो, अस स्पष्ट झालं आहे. एका अभ्यासावरून असं निकष काढण्यात आला आहे की, 20 ते 40 वयोगटातील लोकांना नैराश्याची समस्या उद्भवते. हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत त्यांचा फोन पाहणे आहे.
तज्ञ असेही म्हणतात की फोनच्या निळ्या किरणांमुळे झोपेच्या चक्रात फरक पडू शकतो. असं म्हटलं जातं की, यामुळे मेलाटोनिन हार्मोन बाहेर पडतो. परिणामी, झोप भंग होते आणि शरीर थकतो. त्याऐवजी रात्री चांगली झोप येण्यासाठी तुम्ही एक चांगले पुस्तक वाचावे, कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवावा किंवा संगीत ऐकावे, असा सल्ला तज्ञ देत आहेत.
- रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघण्याचे दुष्परिणाम
- डोळ्यांची हानी: मोबाईल फोनमधून निघणाऱ्या हानिकारक प्रकाशामुळे डोळ्यांचा नुकसान होतो. यामुळे डोळ्यांवर सुज, डोळ्यांवर ताण वाढणे, डोळे दुखणे, नीट न दिसण्याची समस्या उद्भवू शकते.
- दिवसभर थकवा: रात्री उशिरापर्यंत रील्स बघत असल्यामुळे अनेक जण उशिरा झोपतात. परिणामी ते सकाळी लवकर उठू शकत नाही. यामुळे त्यांना दिवसभर थकवा आणि आळस जाणवू शकतो.
- डोकेदुखी: रात्री पुरेशा प्रमाणात झोप न झाल्यामुळे डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.
- अशाप्रकारे करा स्वत:चं संरक्षण
- तुम्हाला वरील आजारांपासून स्वत:च बचाव करायचं असेल तर कमी प्रमाणात रील्स पाहण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्याच्या 2 तासाआधी मोबाईल पाहू नका.
- कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवा.
- पुस्तके वाचा किंवा आवड असलेल्या क्रिया करा.
(अस्वीकरण: ही सामान्य माहिती केवळ वाचनाच्या उद्देशाने दिली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.)