मुंबई : आंतरराष्ट्रीय राउंड टेबल इव्हेंट दरम्यान, मुंबईत स्फेरा सोल्यूशन्सनं भारताच्या कॅस्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यापक फील्ड अभ्यासाचा सारांश सादर केला. प्रादेशिक सरासरीच्या तुलनेत, शाश्वत शेती अंतर्गत शिक्षण, प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांनी सर्व प्रमुख LCA प्रभाव श्रेणींमध्ये सुमारे 30% सुधारणा दर्शवल्या.
या राउंड टेबल इव्हेंटमध्ये जगभरातील विविध देशांतील 100 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमापूर्वी, 30 सदस्य कंपन्यांसाठी गुजरातमधील शेतांवर एक फील्ड ट्रिप आयोजित करण्यात आली होती, जिथं उपस्थित पाहुण्यांना SuCCESS शेती कोडच्या प्रभावाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कार्यक्रमादरम्यान, स्फेरा सोल्यूशन्सनं 2022-2023 च्या फील्ड मूल्यांकनाचे प्रमाणिक निकाल यावेळी सादर केले.
याव्यतिरिक्त, TTC द्वारे सादर केलेल्या प्रभाव मूल्यांकन अहवालात असं दिसून आलं की SuCCESS प्रशिक्षण प्रमाणपत्रामुळं शेतकऱ्यांना मोठे फायदे मिळाले आहेत, जसं की 15% खर्च कपात, 25% उत्पादनवाढ आणि पारंपरिक शेतीच्या तुलनेत शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न 30% नं वाढल्याचं यावेळी दिसून आलं.
BASF च्या ग्लोबल कॅटेगरी मॅनेजर करिन वॅगनर म्हणाल्या, "आमच्या सदस्यांसोबत श्वासत शेतीतील झालेला बदल सामायिक करताना आम्हाला आनंद होत आहे. शेतकऱ्यांसाठी, उद्योगासाठी आणि विशेषतः पर्यावरणासाठी श्वासत शेती फायद्याची आहे". यावेळी जयंत ॲग्रोचे अध्यक्ष अभय उदेशी म्हणाले, "आमच्या सदस्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला अभिमान वाटतोय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 8 वर्षांहून अधिक काळ लागला. आम्ही श्वासत शेतीचे फायदे अधिक शेतकऱ्यांपर्यंत आणि जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत."
"SuCCESS कोडमुळं शेतकऱ्यांची सहनशक्ती वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे, दीर्घकालीन उपजीविका सुरक्षित करणे हे समाज आणि उद्योगाच्या सहकार्यामुळं शक्य आहे.", असं सस्टेनेबल कॅस्टर असोसिएशनचे संचालक प्रशांत पास्तोरे म्हणाले.
आर्केमाचे संचालक ग्विडो एम. डोना म्हणाले, "आम्ही कॅस्टरच्या शाश्वततेच्या सुधारणेसाठी एकात्मिक दृष्टिकोन गरजेचा आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे."
हे वाचलंत का :