उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघीण पाच बछड्यांसह घालते पर्यटकांना भुरळ, पाहा व्हिडिओ - TIGRESS SIGHTED WITH 5 CUBS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 2, 2025, 11:08 AM IST
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. F- 2 (एफ-2) नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचं उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावले आहेत. F-2 वाघीण ही फेरी वाघिणीची मुलगी आहे. N-4 आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. सध्या या परिसरात जे-मार्क नावच्या वाघाचा दबदबा आहे. नवंवर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावलं नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडं वळली आहेत. या जंगलात वाघोबाचं हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढीस लागली आहे. सध्या ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.