ETV Bharat / health-and-lifestyle

आठवड्यातून किती दिवस खाव्यात हिरव्या भाज्या? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात - GREEN LEAFY VEGETABLES BENEFITS

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. निरोगी आरोग्य जगण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. वाचा सविस्तर..,

8 HEALTHIEST LEAFY GREEN VEGETABLES  How Healthy Are Leafy Greens  Are Leafy Greens Good For You  Green Leafy Vegetables Benefits
हिरव्या भाज्या खाण्याचे फायदे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 5, 2025, 7:00 AM IST

Green Leafy Vegetables Benefits: हिरव्या पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. असं म्हटलं जाते की, दररोज कोणत्या ना कोणत्याही प्रकारच्या हिरव्या भाजीचा समावेश आहारात करावा. हे निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. हिरव्या भाज्यांमध्ये चरबी कमी असते तसंच यात प्रथिने, जीनवसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. असं माहिती असून देखील अनेक लोकांना पालेभाज्या खायला आवडत नाही. परंतु आवडत नसेल तरी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचं आहे.

पोषणतज्ञ डॉ. स्वरूपा राणी यांच्या मते, हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसंच लोह, जस्त आणि फॉलिक ॲसिड देखील भरपूर असते. पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या बद्धकोष्ठता टाळता येते. हिरव्याभाज्या व्हिटॅमिन ए आणि सी तसंच कॅल्शियमने समृद्ध असतात. यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. असं केल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या टाळू शकता.

  • तांदुळजा भाजी: ही भाजी पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे. तसंच अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि दृष्टी सुधारते. तसंच त्यातील फायबर घटक पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते.
  • पालक: पालकामध्ये मुबलक प्रमाणात रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. तसंच पालकामध्ये जीवनसत्त्व अ, ब, क, के, मॅग्नेशियम आणि फॉलिक ॲसिड सारखे खनिजे देखील आढळतात. जे कर्करोगासारख्या आजारांना प्रतिबंधित करतात. तसंच फुफ्फुस आणि हृदरोगांपासून संरक्षण करतात.
  • आंबाडीची भाजी: यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे हृदयरोगापासून संरक्षण करते आणि हाडे मजबूत करते. हे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवते आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.
  • मेथी: मेथीच्या पानांमध्ये फायबर, प्रथिने, लोह, सोडियम, तांबे, फॉस्फरस, जस्त आणि जीवनसत्त्वे असतात. त्यातील फायबर चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. शिवाय, त्यातील ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिड केस गळतीची समस्या दूर करते.
  • पुदिना: यामध्ये जीवनसत्त्वे अ, क आणि ब कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अन्न पचायला सोपे होते आणि गॅसची समस्या कमी होते. हे श्वसनाच्या समस्यांना देखील प्रतिबंधित करते आणि स्नायू दुखणे आणि डोकेदुखीपासून आराम देते.
  • मायाळू: व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि कॅरोटीन सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध. त्यातील सेलेनियम, नियासिन आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड रक्तदाब, डोळे आणि मेंदूचे कार्य सुधारतात. नियमित सेवनाने त्वचा मऊ होते.
  • कढीपत्ता: ते दृष्टी सुधारते. साखर, जास्त वजन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या नियंत्रित करते. त्याचे अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म संसर्ग रोखतात. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदय आणि मूत्रपिंडांचे संरक्षण करते.
  • कोथिंबीर: केवळ पदार्थांना चव आणि सुगंध प्रदान करत नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने तसंच लोह आणि मॅंगनीज भरपूर असते. कोथिंबीर दमा आणि पचनाच्या समस्या टाळते. तसंच तणाव कमी करते. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित करते आणि अतिरिक्त वजन कमी करते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेह ग्रस्तांनी पपईचं सेवन करावे का? तज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे
  2. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे? या ७ पदार्थांचे सेवन करा
  3. हृदयविकार ते कर्करोगापासून बचाव करण्यासाठी 'काळी द्राक्षे' फायदेशीर
  4. हे जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम; निरोगी राहाण्यासाठी आजच करा आहारात समावेश
  5. अशाप्रकारे करा शरीरातील 'व्हिटॅमिन बी 12' ची कमतरता पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.