गकबेर्हा Leading Wicket-Taker in T20 Cricket : आयसीसीची मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आता जवळ आली आहे. याआधी, एकीकडे संघ आपापली तयारी करत असताना, खेळाडू वेगवेगळ्या लीगमध्ये खेळून त्यांची तयारी अंतिम करत आहेत. दरम्यान, एक नवीन विक्रम रचला गेला आहे. हा आंतरराष्ट्रीय विक्रम नाही, पण तरीही त्याचं खूप महत्त्व आहे. अफगाणिस्तानचा युवा खेळाडू रशीद खान आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं जगभरातील दिग्गज गोलंदाजांना मागं टाकलं आहे.
A new T20 king is crowned 👑
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2025
Rashid Khan climbs past Dwayne Bravo, who had been the top T20 wicket-taker since April 2016 🤯 pic.twitter.com/8AcO33pBPi
रशीद खाननं T20 क्रिकेटमध्ये पुर्ण केल्या 633 विकेट्स : रशीद खान आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं घेतलेल्या विकेटची संख्या आता 633 झाली आहे. यासह त्यानं वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला मागं टाकलं आहे, जो अव्वल स्थानावर होता, हा विक्रम त्यानं खूप पूर्वी केला होता. 2015 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रशीद खाननं आतापर्यंत 461 T20 सामने खेळले आहेत आणि एकूण 633 विकेट्स घेतल्या आहेत. यात लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विकेट्सचा समावेश आहे. या T20 क्रिकेटमध्ये रशीद खानची सरासरी आतापर्यंत 18च्या आसपास आहे आणि तो साडेसहा च्या इकॉनॉमीनं विकेट्स घेत आहे. जरी तो आता T20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असला तरी, रशीद खानला बऱ्याच काळापासून नंबर वन गोलंदाज मानलं जातं.
🚨 HISTORY BY RASHID KHAN 🚨
— Himanshu Ladha (@HimanshuLadha8) February 5, 2025
- Rashid Khan becomes the leading wicket taker in T20 History (632 wickets).
1000 wickets on the way in future 🐐 pic.twitter.com/P7Wupg6iZ2
रशीद खान T20 मध्ये घेऊ शकतो 1000 विकेट्स : जर आपण ड्वेन ब्राव्होबद्दल बोललो तर 2006 मध्ये पदार्पणानंतर त्यानं 582 सामन्यांमध्ये 631 विकेट्स घेतल्या आहेत. तो बराच काळ नंबर वनच्या खुर्चीवर बसला होता, पण आता त्याला दुसऱ्या क्रमांकावर जावं लागणार आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही गोलंदाजाला T20 क्रिकेटमध्ये 1000 बळी घेता आलेले नाहीत, परंतु रशीद खान ज्या वेगानं धावत आहे, त्यामुळं तो असा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनू शकतो. रशीद फक्त 26 वर्षांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त तो जगभरातील लीगमध्ये खेळतो, त्यामुळं ही कामगिरी करणे त्याच्यासाठी कठीण काम नसेल. येणाऱ्या काळात तो क्रिकेटच्या जगात कसा गोलंदाजी करतो हे पाहणं बाकी आहे. मात्र सध्या तरी T20 क्रिकेटमध्ये त्याच्या जवळपासही गोलंदाज नाही.
Rashid Khan becomes top wicket-taker in T20 history during SA20 Qualifier One clash
— ANI Digital (@ani_digital) February 5, 2025
Read @ANI Story | https://t.co/PSlcKqU1nl#RashidKhan #T20cricket #Afghanistan #SA20 pic.twitter.com/6bshz5REGQ
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू :
- 633 - राशिद खान*
- 631 - ड्वेन ब्राव्हो
- 574 - सुनील नरेन
- 531 - इम्रान ताहिर
- 492 - शाकिब अल हसन
- 466 - आंद्रे रसेल
- 416 - ख्रिस जॉर्डन
🚨 HISTORY BY RASHID KHAN 🚨
— All Cricket Records (@Cric_records45) February 5, 2025
Rashid Khan becomes the leading wicket taker in T20 History.
Most Wickets in T20 format
633 - Rashid Khan*
631 - Dwayne Bravo
574 - Sunil Narine
531 - Imran Tahir
492 - Shakib Al Hasan
466 - Andre Russell
416 - Chris Jordan pic.twitter.com/Nz5gEnuco7
एमआय केपटाऊननं 39 धावांनी जिंकला सामना, अंतिम फेरीत स्थान : या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर 5 फेब्रुवारी रोजी पार्ल रॉयल्स विरुद्ध झालेल्या SA20 च्या क्वालिफायर 1 सामन्यात, रशीद खानच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स केपटाऊननं प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या. एमआय केपटाऊनच्या कोणत्याही फलंदाजानं अर्धशतक झळकावलं नाही परंतु त्यांच्या टॉप 7 फलंदाजांपैकी 6 फलंदाजांनी दुहेरी अंकात धावा केल्या, त्यापैकी 3 जणांनी 40 पेक्षा जास्त धावा केल्या. पार्ल रॉयल्सना विजयासाठी पूर्ण 200 धावांचं लक्ष्य मिळालं. पण ते 19.4 षटकांत 160 धावांवर सर्वबाद झाले आणि सामना 39 धावांनी गमावला. पार्ल रॉयल्सला लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यात कर्णधार रशीद खान, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा यांच्यासह एमआय केपटाऊनच्या गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. या सर्वांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. या विजयासह एमआय केपटाऊननं आता थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे.
हेही वाचा :