ETV Bharat / technology

Realme P3 Pro स्मार्टफोन लवकरच लॉंचसाठी सज्ज, गेमिंगचा मिळणार दमदार अनुभव - REALME P3 PRO LAUNCH DATE

Realme P3 Pro स्मार्टफोन लवकरच लॉंच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक दमदार तसंच उत्तम फीचर मिळणार आहे.

Realme P3 Pro
Realme P3 Pro स्मार्टफोन (Realme)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2025, 10:46 AM IST

हैदराबाद : Realme भारतीय बाजारात Realme P3 Pro हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. Realme P2 Pro च्या या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये दमदार फीचर्स असतील. कंपनीनं या फोनच्या गेमिंग फीचर्सची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अधिक जाणून घेऊया Realme P3 Pro बद्दल...

कधी होणार लॉंच?
कंपनीनं बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया सिरीज (BGIS) 2025 आणि बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया प्रो सिरीज (BMPS) 2025 साठी अधिकृत स्मार्टफोन प्रायोजक म्हणून भागीदारीची घोषणा आधीच केली आहे. अहवालानुसार, Realme P3 Pro फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. हा आगामी स्मार्टफोन 12GB RAM + 256GB स्टोरेजच्या कॉन्फिगरेशनसह सादर केला जाऊ शकतो.

Realme P3 Pro स्पेसिफिकेशन
सध्या, अधिकृत स्पेसिफिकेशन जाहीर केलेले नाहीत. तथापि, लीक झालेल्या माहितीनुसार, P3 Pro हा Realme 14 Pro चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळं, यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४५०० निट्स ब्राइटनेससह ६.७७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, ज्याचं रिझोल्यूशन १०८० x २३९२ पिक्सेल असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित रिअलमी UI ६.० वर चालण्याची शक्यता आहे. तो मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० एनर्जी (४ एनएम) चिपसेटद्वारे समर्थित असू शकतो. कॅमेरा सेटअप पाहता, यात ५० एमपी प्रायमरी कॅमेरा (ओआयएस सपोर्टसह) आणि २ एमपी डेप्थ कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

काय असतील इतर वैशिष्ट्ये ?
इतर वैशिष्ट्यांमध्ये स्टीरिओ स्पीकर्स, ब्लूटूथ ५.४, वाय-फाय ६, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी २.० सपोर्ट समाविष्ट आहे. ६००० एमएएच बॅटरी असलेला हा फोन ४५ वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. तसंच, हा स्मार्टफोन IP68/IP69 सर्टिफिकेशनसह धूळ आणि पाण्यापासून संरक्षित असेल.

हे वाचलंत का :

  1. आयफोन १५ बनला नंबर १, २०२४ मध्ये आयफोन १५ची सर्वाधिक विक्री, जाणून घ्या टॉप 10 सेल होणाऱ्या फोनची यादी
  2. आयफोनवर आलं पहिलं पॉर्न अ‍ॅप, अ‍ॅपलनं केली चिंता व्यक्त
  3. iQOO Neo 10R रॅगिंग ब्लू रंगात ११ मार्चला होणार लाँच, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.