सिडनी Australia Team News : 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सचं खेळणं जवळजवळ अशक्य वाटत आहे. भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेच्या समाप्तीपासून कमिन्स मैदानाबाहेर आहे, ज्यात तो कांगारु संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरही आला नव्हता. या दौऱ्यावर न येण्याचं एक कारण म्हणजे तो दुसऱ्यांदा वडील बनला आहे, तर कमिन्स त्याच्या घोट्याच्या समस्येशी देखील झुंजत आहे, ज्यामुळं त्याला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्रास झाला होता.
Not ideal for Australia with just two weeks until the start of #ChampionsTrophy 2025 in Pakistan and UAE 😲
— ICC (@ICC) February 5, 2025
Details 👇https://t.co/646oMGu8JQ
कमिन्सबाबत मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचं मोठं विधान : ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथं ते यजमान संघाविरुद्ध 2 कसोटी आणि 2 वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेले आहेत, त्यानंतर ते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला रवाना होतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी पॅट कमिन्सबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणं त्याच्यासाठी खूप कठीण वाटते. याशिवाय, जोश हेझलवूडला निर्धारित वेळेपर्यंत तंदुरुस्त होणंही कठीण वाटत आहे, पुढील काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल. सेन रेडिओला दिलेल्या निवेदनात मॅकडोनाल्ड म्हणाले की, कमिन्सनं अद्याप पुन्हा गोलंदाजी सुरु केलेली नाही, त्यामुळं त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि या परिस्थितीत आपल्याला दुसऱ्या कर्णधाराची घोषणा करावी लागेल. हेझलवुडच्या बाबतीतही असंच काहीसं घडत आहे. वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुढील काही दिवसांत निर्णय घेऊ.
Pat Cummins is " heavily unlikely" for the champions trophy because of his ankle issue
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2025
here's who could lead australia: https://t.co/PExtVI9pzd pic.twitter.com/HZAgR5aSJE
स्मिथ किंवा हेड होणार ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार : जर पॅट कमिन्स 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही, तर अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागेल. सध्या या शर्यतीत दोन नावं आघाडीवर आहेत, एक स्टीव्ह स्मिथचं आणि दुसरं सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडचं. स्टीव्ह स्मिथ सध्या श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संघाचं नेतृत्व करत आहे, परिणामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो कर्णधार होण्याची जास्त शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन संघ या मेगा टूर्नामेंटमधील पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
हेही वाचा :