ETV Bharat / entertainment

व्हॅलेंटाईन प्री-वीकेंडमध्ये 'सनम तेरी कसम' टॉपवर, नव्या-जुन्या रिलीजवरही केली मात - MOVIES ON VALENTINE PREWEEKEND

व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्तानं पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'सनम तेरी कसम' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या कमाईवर एक नजर टाका...

'Sanam Teri Kasam'-'Yeh Jawaani Hai Deewani'
'सनम तेरी कसम'-'ये जवानी है दीवानी' ((Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 10, 2025, 1:46 PM IST

मुंबई - व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर अनेक रोमँटिक प्रेमकथा असलेले चित्रपट रिलीज होत आलेत. मात्र यंदाच्या वर्षी एका नऊ वर्षे जुना असलेल्या 'सनम तेरी कसम' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गर्दा अडवून दिला आहे. हा चित्रपट पुनर्प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ब्लॉकबस्टर झाला आहे आणि तो देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन यांच्या भूमिका असलेला हा रोमँटिक चित्रपट व्हॅलेंटाईन प्री-वीकेंडमध्ये सर्वात आघाडीवर आहे. या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या 'लवयापा' आणि 'बदमाश रविकुमार' या नवीन चित्रपटांनाही हा चित्रपट जोरदार टक्कर देत आहे. इतकंच नाही तर, तिकीट बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटानं रणबीर कपूर-दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटालाही मागं टाकलं आहे.

हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन स्टारर 'सनम तेरी कसम' हा चित्रपट 2016 मध्ये पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता. सुरुवातीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ९ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण जेव्हा यावर्षी ७ फेब्रुवारी रोजी चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्रमोशन नसतानाही आश्चर्यचकित करणारी कमाई केली आहे.

'सनम तेरी कसम'चं रिलीजच्या तिसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन - 'सनम तेरी कसम' चित्रपटानं री-रिलीजच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला. निर्मात्यांच्या मते, पहिल्या दिवशी या चित्रपटानं तब्बल ५.१४ कोटी रुपयांची कमाई केली. ही री-रिलीज चित्रपटाची सर्वाधिक कमाई मानली जाते. यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं ६.२२ कोटींची कमाई केली.

सॅकॅनिल्कच्या मतानुसार विनय सप्रू आणि राधिका राव दिग्दर्शित या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. व्हॅलेंटाईनच्या आधीचा वीकेंड असल्यानं, चित्रपटाला त्याचा फायदा झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्यानं अंदाजे ६ कोटींची कमाई केली. तीन दिवसांनंतर, 'सनम तेरी कसम'च्या पुनर्प्रदर्शनाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे १७.३६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

'सनम तेरी कसम' चित्रपटाचा री-रिलीजच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बुक माय शोवर या चित्रपटाचं १५७ हजार बुकिंग झाले. अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' 'बुक माय शो' वर २९९ हजार बुकिंगसह पहिल्या स्थानावर आहे. 'देवा' १०० हजार बुकिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर रणबीर कपूरचा 'ये जवानी है दिवानी' री-रिलीज झालेला चित्रपट ९८ हजार बुकिंगसह चौथ्या स्थानावर आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

या आठवड्याच्या शेवटी दोन नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही 'सनम तेरी कसम' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय आणि जुन्या चित्रपटाचा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून चित्रपटसृष्टीही आश्चर्यचकित झाली आहे. या आठवड्याच्या शेवटी, 'बदमाश रवी कुमार', 'लवयापा' आणि 'इंटरस्टेलर' यांच्यातील ब्लॉकबस्टर टक्करसाठी ट्रेंड सुरू झाला होता, परंतु 'सनम तेरी कसम' चित्रपट एक सरप्राईज पॅकेज म्हणून आला आणि त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले. येत्या काळात हा चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतो. प्रेक्षकांची पसंती लक्षात घेता, व्हॅलेंटाईन डे आठवड्यात या चित्रपटाला खूप फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.