हैदराबाद : अॅपलचा आयफोन १५ हा २०२४ मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. एक नाही तर दोन संशोधकांच्या अहवालानुसार, ॲपलचा हा आयफोन २०२४ चा सर्वाधिक विक्री होणारा फोन आहे. एवढंच नाही, तर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या टॉप-१० फोनमध्ये अॅपलचा आयफोन वर्चस्व गाजवतोय.
आयफोन १५ बनला नंबर १
कॅनालिस आणि काउंटरपॉइंटच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री आयफोन १५ झालीय. या अहवालानुसार, आयफोन १५ ची 2024 मध्ये विक्री ३% झाली आहे. या यादीतील दुसऱ्या फोनचं नाव आयफोन १६ प्रो मॅक्स आहे, जो ॲपलनं २०२४ च्या शेवटच्या महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये लाँच केला होता, परंतु तरीही तो २०२४ चा दुसरा सर्वाधिक विक्री होणारा फोन आहे.
सर्वाधिक विक्री होणारे ७ फोन ॲपलचे
या अहवालातील खास गोष्ट म्हणजे त्यात समाविष्ट असलेल्या १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या फोनच्या यादीपैकी ७ फोन ॲपलचे आहेत. उर्वरित तीन फोन सॅमसंगचे आहेत. या यादीतील पहिला सॅमसंग फोन सॅमसंग गॅलेक्सी ए१५ आहे, जो सर्वाधिक विक्री होणाऱ्या फोनच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात या सॅमसंग फोनची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरू होते. याचा अर्थ असा की सॅमसंगचा एक बजेट फोन २०२४ चा सर्वाधिक विक्री होणारा फोन बनला आहे, तर यादीतील सॅमसंगचा एकमेव फ्लॅगशिप फोन म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा आहे. हा फोन सॅमसंगनं २०२४ च्या सुरुवातीला लाँच केला होता.
२०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० फोनची यादी
आयफोन १५
आयफोन १६ प्रो मॅक्स
आयफोन १५ प्रो मॅक्स
सॅमसंग गॅलेक्सी ए१५
आयफोन १६ प्रो
आयफोन १५ प्रो
आयफोन १६
सॅमसंग गॅलेक्सी ए१५ ५जी
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा
आयफोन १३
या अहवालाच्या टॉप-१० यादीत ॲपल आणि सॅमसंग व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन नाही. तथापि, २०२४ मधील अव्वल फोन निर्माता कंपनी म्हणजे अॅपल आणि सॅमसंग नंतर शाओमी, ज्यानं जागतिक स्तरावर १६८.६ दशलक्ष फोन युनिट्स विकून १४% बाजारपेठेतील हिस्सा काबीज केला आहे.
हे वाचलंत का :