ETV Bharat / technology

सर्वांचं रक्त लाल, मग कडकनाथ कोंबडीचं रक्त काळं कसं? - Kadaknath hen

Kadkanath Chicken : भारतात चिकन आवडीनं खाल्ल्या जातं. त्यासाठी कडकनाथ कोंबडीचं मास खाण्यासाठी चांगलं मानलं जातं. कडकनाथ कोंबडीच्या मासात 10 पट जास्त लोहाचं प्रमाण असतं. मात्र, तुम्हाला माहिती का? या कोंबडीचं रक्त का काळं असतं? तिची हाडं, मास काळ असण्याचं काय कारण असेल? चला तर आज आपण सविस्तर जाणून घेऊया....

Kadaknath hen
कडकनाथ कोंबडी (Getty Image)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 20, 2024, 3:27 PM IST

Updated : Sep 21, 2024, 11:59 AM IST

हैदराबाद Kadkanath Chicken : मध्य प्रदेशातील झाबुआ डोंगराळ भूप्रदेशांत, कोंबडीची एक दुर्मिळ आकर्षक जात आपल्याला पहायला मिळते. या कोंबडीला आपण कडकनाथ असं म्हणतो. ही कोंबडी सांस्कृतिक तसंच जैविक वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. कडकनाथ कोंबडीनं अनेकांना आपल्याकडं आकर्षित केलंय. जेट-ब्लॅक पिसे, काळं मांस तसंच काळ्या रक्तामुळं या कोंबडीला विशेष मागणी आहे. मात्र, तुम्हाला माहिती का कडकनाथ कोंबडीचं रक्त, मास (चिकन) रंग काळा का असतो? या मागं एक वैज्ञानिक रहस्य दडलेलं आहे, तेच आज आपण जाणून घेऊया...

अद्वितीय कडकनाथ कोंबडी? : कडकनाथ कोंबडी, (गॅलस डोमेस्टिकस) मध्य प्रदेशातील आदिवासी प्रदेशात आढळते. प्रामुख्यानं भिल जमाती या कोंबडीचं पालन करतात. मात्र, कोंबडीच्या इतर जातींपेक्षा इत्यात वेगळं काय आहे?, म्हणजे तिचा काळा रंग, मांस, हाडं, अगदी अंतर्गत अवयवही तिचे काळे आहेत. मात्र, यात सर्वात महत्वाचं म्हणजे या कोंबडीचं रक्त काळं असतं.

Kadkanath Chicken
कडकनाथ कोंबडी (Getty Image)

कशामुळं होतं काळं रक्त : कुक्कुटपालनाच्या व्यावसायात काळ रक्त असणारी कोंबडी तशी दुर्मिळच आहे. या कोंबडीचं गडद काळं रक्त फायब्रोमेटोसिस नावाच्या अनुवांशिक स्थितीमुळं निर्माण होतं. कोंबडीत मेलेनिनचा जास्त प्रमाणात संचय होतो. त्यामुळं तिचा रंग देखील काळा होतो. हे मेलेनिन रंगद्रव्य प्राण्यांमध्ये त्वचा तसंच केसांच्या रंगासाठी जबाबदार असतं. फायब्रोमेलेनोसिस फक्त कडकनाथमध्ये आढळतं असं नाही. चीनच्या सिलकी चिकन सारख्या इतर काही जातींमध्ये देखील हे पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळं कडकनाथचं काळं मांस, गडद काळं रक्त हे विशेष अद्वितीय बनवतं.

कडकनाथ कोंबडीची जात एक भारतीय जाती आहे. तिच्या अद्वितीय अनुवांशिक वैशिष्ट्यांमुळं तिचं रक्त काळं तसंच गड लाल किंवा खोल किरमिजी रंगाचं असतं. कडकनाथ कोंबडीमध्ये अनुवांशिक गुणधर्म असतात. ज्यामुळं तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात पोर्फिरन्स असतात. कडकनाथ कोंबडीवर करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, कडकनाथ कोंबडीच्या रक्त रसायनशास्त्रात भिन्नता असते. तिच्या रक्तात विशिष्ट प्रथिनं खनिजांच्या उच्च पातळीचा समावेश असतो, ज्यामुळं रक्ताच्या रंगावर त्याचा प्रभाव पडतो. - सचिन देबाजे, (Research Scholar Department of Zoology Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University Chatrapati Sambhajinagar)

कडकनाथ कोंबडीचं महत्त्व : शतकानुशतकं, मध्य प्रदेशातील आदिवासींच्या जीवनात कडकनाथ कोंबडीचं विशेष स्थान आहे. पारंपारिकपणे, हा पक्षी शुभ मानला जातो. बऱ्याचदा विधी तसंच धार्मिक समारंभात या पक्षाचा वापर होतो. भील समुदाय कडकनाथला शक्ती तसंच चैतन्याचं प्रतीक मानतात. कोंबडीच्या काळ्या मांसामध्ये औषधी गुणधर्म असल्याचं मानलं जातं. तसंच अशा मासाचं सेवन केल्यानं माणसाच्या शरिरातील ऊर्जा वाढते, असं म्हटलं जातं.

Kadkanath Chicken
कडकनाथ कोंबडी (Getty Image)

बाजारपेठांमध्ये कडकनाथची मागणी : कडकनाथ बद्दलचा सांस्कृतिक आदर इतका मोठा आहे की पक्षी ही एक प्रतिष्ठित भेट मानली जाते. बहुतेकदा सणाच्या प्रसंगी, विवाहादरम्यान जमातींमध्ये या कोंबडीची देवाणघेवाण केली जाते. अनेकांसाठी ही कोंबडी आपल्याकडं असणे संपत्तीचं लक्षण मानलं जातं. आजही, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान स्थानिक बाजारपेठांमध्ये कडकनाथ कोंबड्यांची मागणी वाढतेय. त्यामुळं शेतकरी देखील कडकनाथ कोंबडीच्या कुकुटपालनाकडं आता वळताय.

अनुवांशिक गुणधर्म : कडकनाथचं काळं रक्त अनेकांना धक्कादायक वाटतं असलं तरी ते पूर्णपणे काळं नाहीय. तिचं रक्त काळं, तसंच गडद लाल असतं. मांस आणि अंतर्गत अवयवांचा काळा रंग कोंबडीत असणाऱ्या मेलॅनिनमुळं असतं. हा अनुवांशिक गुणधर्म संरक्षणाचा एक प्रकार म्हणून विकसित झाला आहे, असं मानलं जातं, कारण मेलेनिन अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाविरूद्ध प्रतिकार करतं. त्यामुळं पक्ष्यांना कठीण वातावरणात वाढण्यास मदत करू शकतं. असे पक्षी त्यांच्या लवचिकतेसाठी आणि अत्यंत खराब हवामानाच्या परिस्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात.

Kadkanath Chicken
कडकनाथ कोंबडी (Getty Image)

मासातून मिळतात उच्च-प्रथिन : कडकनाथ कोंबडी उच्च-प्रथिनांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. काळ्या मांसामध्ये विशिष्ट अमीनो ऍसिड, लोह, जस्तासारखी खनिजे असतात. तसंच बी12 सारखी जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात, असं म्हटले जातं. नेहमीच्या चिकनच्या तुलनेत, त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी असतं. त्यामुळं या कोंबडीचं मास आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत करतं.

आर्थिक संधी आणि आव्हानं : अलिकडच्या काही वर्षांत, कडकनाथ कोंबडीची प्रजाती मध्य प्रदेशातील आदिवासी खेड्यांमधून रेस्टॉरंट्सच्या स्वयंपाकघरात पोहचलीय. तिच्या आरोग्यविषयक गुणधर्मामुळं शहरी लोकांना तिचं मास खूपच आवडतंय. तिच्या चिकनची अनोखी चव, काळं मांस तसंच तिची दुर्मिळता यामुळं मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारख्या शहरांमध्ये कडकनाथला मोठी मागणी आहे.

Kadkanath Chicken
कुकुट पालन (Getty Image)

कडकनाथ कोंबडीवर सबसिडी : कडकनाथच्या वाढत्या मागणीनं झाबुआ भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी खुल्या झाल्या आहेत. तिची क्षमता ओळखून मध्य प्रदेश सरकारनं कडकनाथ कोंबडीवर सबसिडी, प्रशिक्षण कार्यक्रम, सहकारी संस्था स्थापन करून प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. कडकनाथला 2018 मध्ये भौगोलिक इंडिकेशन (GI) टॅग देखील मिळाला.

अधिक गुंतवणूक : वाढती मागणी असूनही, मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरणासमोर आव्हानं आहेत. कडकनाथ कोंबड्यांचा वाढीचा दर नियमित ब्रॉयलर कोंबड्यांपेक्षा कमी असतो. ब्रॉयलर कोंबडच्या तुलनेत कडकनाथ कोंबडीला परिपक्व होण्यासाठी सहा महिने लागतात. या दीर्घ कालावधीमुळं शेतकऱ्यांना अधिक गुंतवणूक आणि संयम बाळगण्याची गरज असते. याव्यतिरिक्त, कडकनाथ कोंबडी बंदिस्त करता येत नाही. तिला फिरण्यासाठी मोकळी जागा आवश्यक असते, ज्यामुळं तिच्या उत्पादन खर्चात भर पडते. शिवाय, कडकनाथ कोंबडीची अनुवांशिक शुद्धता राखणे हा एक मुद्दा बनला आहे. मागणी वाढल्यानं काही विक्रेत्यांनी काळ्या पिसांची कोंबडी कडकनाथ म्हणून देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी, कडकनाथ कोंबडीची सत्यता प्रमाणित करण्यासाठी कठोर उपाय लागू केलं जात आहेत, ज्यात डीएनए चाचणी तसंच शेती प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

आधुनिक पाककृतीत कडकनाथचं स्थान : विशिष्ट चव आणि पौष्टिक गुणधर्मामुळं कडकनाथला भारतातील खवय्यांमध्ये स्थान मिळालं आहे. काळं मांस दर्जेदार चवीसाठी ओळखलं जातं. त्यामुळं प्रादेशिक कोंबडीच्या चिकनवर लक्ष केंद्रित केल्यानं तिच्या व्यावसायाला हातभार लागला आहे. कडकनाथचे आरोग्य फायदे देखील खेळाडू आणि फिटनेस प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रथिनांनी भरलेले आणि कमी चरबी असलेलं, काळं मांस अधिक प्रमाणात सुपरफूड म्हणून पाहिलं जात आहे.

कडकनाथचे भविष्य : जसजशी जागरूकता वाढत जाईल, तसतशी कडकनाथ कोंबडी खाद्य बाजारपेठेतील एक प्रमुख घटक बनणार आहे. सतत सरकारी मदत आणि शाश्वत शेती पद्धतींमुळं कडकनाथ कोंबडीचं भविष्य उज्ज्वल दिसतंय.

Last Updated : Sep 21, 2024, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.