रांची : हेमंत सोरेन (Hemant Soren Swearing In Ceremony) हे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून आज (28 नोव्हेंबर) रांची येथील मोरहाबादी मैदानावर दुपारी 4 वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. देशभरातील विरोधी राजकारणातील नेत्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी राहणार उपस्थित : काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते जगदीश साहू (Jagdish Sahu) आणि राज्य मीडिया प्रभारी राकेश सिन्हा (Rakesh Sinha) यांनी सांगितलं की, "काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D. K. Shivakumar), तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क गुरुवारी रांचीला पोहोचतील. तर झारखंड काँग्रेसचे माजी प्रभारी, विधानसभा निवडणुकीचे वरिष्ठ समन्वयक बीके हरिप्रसाद, छत्तीसगडचे माजी प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम हे देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रांचीला पोहोचले आहेत."
ममता बॅनर्जी, अरविंद-सुनीता केजरीवालही शपथविधी सोहळ्याला लावणार हजेरी : झारखंड मुक्ती मोर्चाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) हे देखील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. तसंच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश यादव (Jay Prakash Yadav) यांच्यासह भोला यादव देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा -
- हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; नाराज माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश - Champai Soren To Join BJP
- झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ! "मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून माझा अपमान...", नेमकं काय म्हणाले चंपाई सोरेन? - Champai Soren letter on X
- झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ; फक्त १५३ दिवसात मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, कारण काय? - CM Champai Soren Resigned