मुंबई : अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माच्या शानदार कामगिरीमुळं भारतीय क्रिकेट संघानं वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत हा भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. याआधी भारतानं न्यूझीलंडला १६८ धावांनी पराभूत केलं होतं.
अभिषेकची धडाकेबाज खेळी : या सामन्यात अभिषेकने १३५ धावांची खेळी करत, गोलंदाजीत २ विकेट घेतल्या. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यासोबतच, ५ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. चक्रवर्तीने या मालिकेत पाच विकेट्सही घेतल्या आहेत.
भारताचा मालिकेवर कब्जा : वानखे़डे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या संधीचा फायदा घेत भारतानं २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या. भारताने विजयासाठी दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १०.३ षटकात ९७ धावांवरच गारद झाला आणि त्यांना १५० धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह, टीम इंडियाने ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली.
अशी जिंकली भारताने मालिका : कोलकाता इथं झालेल्या मालिकेतील पहिला टी-२० सामना भारताने ७ विकेट्सनं जिंकला होता. यानंतर, भारतानं चेन्नईतील दुसरा टी-२० २ विकेट्सनं जिंकला. राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा २६ धावांनी पराभव केला. पुण्यात झालेला चौथा टी-२० सामना भारतानं १५ धावांनी जिंकला. तर मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने १५० धावांनी विजय जिंकत ४-१ अशी जिंकली.
मालिकेतील अखेरच्या सामन्यात काय झाल? : या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १०.३ षटकात ९७ धावांवरच गारद झाला आणि त्यांना १५० धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह, टीम इंडियाने ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे.
टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकारांसह १३५ धावांची खेळी केली. यासोबतच शिवम दुबेने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावांचे योगदान दिले आणि तिलक वर्माने १५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने ४ षटकांत ३८ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले.
इंग्लंडकडून यष्टीरक्षक आणि सलामीवीर फिट सॉल्टने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. सॉल्ट व्यतिरिक्त, फक्त जेकब बेथेलने १० आणि लियाम लिव्हिंगस्टोनने ९ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.