Omelette Vs Boiled Egg: एक अंडा संपूर्ण आहारासमान आहे. अनेक जण ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणं पसंत करतात. अंडी खाणं हेल्दी आहे. हे प्रथिने, 9 प्रकारचे आवश्यक अमीनो अॅसिड, आर्यन, जीवनसत्त्वे बी, डी आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. डॉक्टरांच्या मते, नियमित अंडी खाणं आरोग्यसाठी खूप चांगलं आहे. परंतु काही लोकांना ऑम्लेट खाणं आवडते. ते नाश्त्यात ऑम्लेट खातात. परंतु उकडलेल्या अंड्यामध्ये जास्त पोषक घटक आहेत की ऑम्लेमध्ये हे तुम्हाला माहिती आहे काय? जाणून घ्या आरोग्य तज्ञ काय खाण्याचा सल्ला देतात आणि आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे खावी ?
उकडलेले अंडी: उकडलेली अंडी खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, एका उकडलेल्या अंड्यामध्ये सहा ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिने असतात. हे स्नायूंच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तसंच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात असते. तसंच ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत.
उकडलेल्या अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने आणि इतर पोषक तत्वे जास्त असतात. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
- मेंदूचे आरोग्य: उकडलेली अंडी मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले कोलीन हे पोषक तत्व मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या पथकाने केलेल्या संशोधनात हे उघड झाले आहे. यासोबतच, उकडलेली अंडी अनेक आरोग्यवर्धक फायदे देतात.
- ऑम्लेट: ऑम्लेट ही अंड्यांपासून बनवलेली एक स्वादिष्ट डिश आहे. बरेच लोक ऑम्लेट बनवण्यासाठी हिरवी मिरची, हळद, कांदे आणि इतर भाज्या घालतात. काही लोक त्यात चीजही घालतात. हे सर्व साहित्य घातल्यामुळे त्याची चव वाढते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देखील जास्त असतात. तेल आणि चीज सारख्या गोष्टी घातल्यानं कॅलरीज वाढतात. शरीरात अस्वास्थ्यकर चरबी जमा होऊ शकते. तज्ञांचं म्हणणं आहे की, जास्त कॅलरीज घेतल्यानं आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात.
- आरोग्यासाठी कोणते चांगले आहे?
- आरोग्यासाठी चांगले: उकडलेल्या अंड्यांमध्ये सर्व पोषक घटक उपलब्ध असतात. तज्ञांचे म्हणणे आहे की उकडलेले अंडे हे ऑम्लेटपेक्षा खूपच आरोग्यदायी असतात.
- अधिक चविष्ट: उकडलेल्या अंड्यापेक्षा आमलेट अधिक चविष्ट असते.
- पौष्टिक घटक: ऑम्लेटमध्ये भाज्या घातल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. परंतु त्यात कॅलरीज जास्त असतात.
- उकडलेली अंडी किंवा आमलेट खाण्याचे फायदे व्यक्तीच्या शरीराच्या गरजांवर अवलंबून असतात. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उकडलेले अंडे खाणे चांगले. ज्यांना समान पोषक तत्वे अधिक मिळवायची आहेत त्यांच्यासाठी ऑम्लेट चांगला पर्याय आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे.
- उकडलेली अंडी खाण्याची फायदे
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
- पचनाशी संबंधित समस्यांवर योग्य पर्याय
- हाडांच्या आरोग्यासाठी चांगले
- मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर
- स्नायूंच्या आरोग्यासाठी चांगले.
ऑम्लेट खाण्याचे फायदे
- हेल्दी फॅट्स मिळतो
- फायबरसमृद्ध पोष्टिक पदार्थ
- पालकानं भरलेल्या ऑम्लेटमुळे शरीरातील लोह वाढते
- अनेक भाज्या मिळवून तयार केलेल्या ऑम्लेट व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहेत.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6893749/