ETV Bharat / technology

15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' पाच सर्वोत्तम बजेट स्मार्टफोन - BEST 5 BUDGET SMARTPHONES IN INDIA

Top 5 budget smartphones : तुम्ही सर्वोत्तम पाच बजेट स्मार्टफोनच्या शोधत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जाणून घेऊया पाच बेस्ट स्मार्टफोनची माहिती

Top 5 budget smartphones
REALME 14x, vivo T3x, CMF फोन 1 (REALME, Vivo, CMF)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 9, 2025, 10:00 AM IST

हैदराबाद Top 5 budget smartphones : रियलमी कंपनीचा REALME 14X 5G वॉटरप्रूफ फोन असून या फोनची किंमत फक्त 15 हजार रुपयांपासून सुरू होतेय. 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच झालेला हा भारतातील पहिलाच फोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय, जो IP69 रेटिंगसह येतो. हे वैशिष्ट्य फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवतं. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये मजबूत कॅमेरा सेटअप, शक्तिशाली बॅटरी आणि उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Realme 14X 5G हा स्मार्टफोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

REALME 14X 5G चे फीचर
या फोनमध्ये 6.67-इंच (720×1604 पिक्सेल) HD+ IPS LCD स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 6nm प्रोसेसरनं सुसज्ज आहे. फोनमध्ये 6GB / 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB (UFS 2.2) स्टोरेज आहे. मायक्रोएसडीच्या मदतीनं स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. हायब्रिड ड्युअल सिम (नॅनो + नॅनो / मायक्रोएसडी) सह येणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित Realme UI 5.0 OS वर काम करतो. यात 45W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी मिळतेय. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, realme 14X 5G मध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP चा रियर कॅमेरा, LED फ्लॅश आणि f/2.0 अपर्चरसह 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये तुम्हाला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, अल्ट्रा-लिनियर बॉटम-पोर्टेड स्पीकर आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 + IP69 रेटिंग मिळतं.

किंमत : 14,599

Vivo T3x 5G
विवोनं आपला बजेट स्मार्टफोन म्हणून Vivo T3x 5G तुम्ही खरेदी करु शकता. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जनरल 1 प्रोसेसर आहे. या फोनची जाडी फक्त 7.99 मिमी आहे. Vivo T3x 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आणि 6.72 इंच फुलएचडी डिस्प्ले मिळतोय. हा फोन क्रिमसन ब्लिस, सेलेस्टियल ग्रीन आणि सफायर ब्लू रंगांमध्ये येतो. हा Vivo हँडसेट Vivo इंडियाच्या ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

Vivo T3x 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo T3x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा फुलएचडी (1,080×2,408 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले आहे. स्क्रीन 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित फनटच ओएस 14सह येतो. हा फोन 4nm-आधारित स्नॅपड्रॅगन 6 जनरल 1 चिपसेटनं सुसज्ज आहे. डिव्हाइसमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. रॅम व्हर्च्युअली 8 जीबी पर्यंत वाढवता येते. मायक्रोएसडी कार्डद्वारे हँडसेटची स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवण्याचा पर्याय आहे.

6000mAh ची मोठी बॅटरी
Vivo T3x 5G ला पॉवर देण्यासाठी, 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 2-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या हँडसेटला IP64 रेटिंग मिळालं आहे. त्याममुळं फोनचं धूळ आणि पाणी पासून संरक्षण होतं. डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ, जीपीएस, वाय-फाय सारखी मानक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

किंमत : 11,990

CMF Phone 1
नथिंगच्या सब-ब्रँड सीएमएफनचा फोन आकर्षक किमतीसह शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येतो. यात 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्याच वेळी, कंपनीनं समोर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

CMF फोन 1 फीचर
CMF फोन 1मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. हा हँडसेट अँड्रॉइड 14 वर आधारित नथिंग ओएस 2.6 वर चालतो. या स्मार्टफोनला दोन अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळताय. यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ एमोलेड एलटीपीओ डिस्प्ले आहे. फोन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2000 निट्सच्या कमाल ब्राइटनेससह येते. हा हँडसेट मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरवर काम करतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा पर्याय आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत : 13,883

Xiaomi Redmi 14C
Xiaomi चा Redmi 14C 5G स्मार्टफोन एक बजेट फोन आहे. हा फोन तीन प्रकारांमध्ये येते, ज्यामध्ये 4 जीबी + 64 जीबी, 4 जीबी + 128 जीबी आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज प्रकारांचा समावेश आहे. Xiaomi Redmi 14C स्मार्टफोन हा Redmi 13C चा अपग्रेडेड प्रकार आहे. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, टॉप-10 विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत रेडमी 13सी 4जी 9व्या स्थानावर होता. अ‍ॅपल आणि सॅमसंग वगळता, हा एकमेव हँडसेट होता जो टॉप-10 मध्ये स्थान मिळवलंय.

Xiaomi Redmi 14C स्पेसिफिकेशन्स
Redmi 14C 5G मध्ये 6.88-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. याला TUV राईनलँड प्रमाणपत्र आणि 600 Nits ची कमाल ब्राइटनेस आहे. Redmi 14C 5G फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आहे. यासह, वापरकर्त्यांना 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचे पर्याय मिळतील. याशिवाय स्टोरेजचे तीन प्रकार देण्यात आले आहेत. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित Xiaomi HyperOS वर काम करतो.

Redmi 14C 5G चा कॅमेरा
Redmi 14C 5G फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यात 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जर
Redmi 14C 5G मध्ये 5,160mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. तसंच तुम्हाला यात ३३ वॅटचा फास्ट चार्जर मिळतोय. या फोनला धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी IP52 रेटींग मिळालंय. यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील मिळेल.

किंमत : 9,999

POCO M7 Pro 5G
बजेट-फ्रेंडली POCO M7 Pro ५जी स्मार्टफोनमध्ये 20 एमपी सेल्फी कॅमेरा आणि 5110 एमएएच बॅटरी आहे. यामध्ये तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम फीचर्स मिळतील. पोकोनं दोन स्टोरेज व्हेरिएंटसह POCO M7 Pro 5G स्मार्टफोन सादर केला आहे. यात तुम्हाला 6 जीबी रॅम + 128 जीबी आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल.

Poco M7 Pro 5G फीचर
Poco M7 Pro 5G मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा GOLED डिस्प्ले आहे. जे 120Hz रिफ्रेश रेटवर काम करते. हा फोन 2,100 निट्सच्या पीक ब्राइटनेस, HDR10+ रेशोसह येतो. सुरक्षिततेसाठी, त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण देखील आहे. फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50MP सोनी LYT-600 प्रायमरी लेन्स आणि 2MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स समाविष्ट आहे. कॅमेरा सेटअपमध्ये एआय नाईट मोड आणि एआय झूम सारखे एआय फीचर्स आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 एमपीचा सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7025 अल्ट्रा एसओसी द्वारे समर्थित आहे. हा फोन गेमिंगसाठी उत्कृष्ट आहे. यात अँड्रॉइड 14 आधारित हायपर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे, ज्यासोबत दोन वर्षांचे ओएस अपडेट आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट उपलब्ध आहेत. यात तुम्हाला 8 जीबी पर्यंत रॅम आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल.

बॅटरी आणि चार्जिंग
Poco M7 Pro मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5110mAh बॅटरी आहे, जी चार्जिंगसाठी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देखील आहेत. हे ड्युअल सिम 5G, 4G, वायफाय, ब्लूटूथनं देखील सुसज्ज आहे.

किंमत : 14,299

हे वाचलंत का :

  1. iQOO Neo 10R फर्स्ट लूक आला समोर, वैशिष्ट्ये, किंमत, डिझाइन, कॅमेरा आणि बरेच काही
  2. 2028 पर्यंत मिळताय iQOO 12 ला Android OS सह, 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स, iQOO ची मोठी घोषणा
  3. पुढील आठवड्यात लाँच होणार Apple iPhone SE 4, जाणून घ्या अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.