मुंबई - बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आता 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे विकी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे. अलीकडेच, विकी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचला होता. शनिवारी तो पटनाला पोहोचला. पटना येथे पोहोचल्यावर, विकी कौशलनं एका रस्त्यावरील स्टॉलवर 'लिट्टी चोखा'चा आनंद घेतला. तासनतास जिममध्ये घालवणाऱ्या विकीला खाण्याची खूप आवड आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.
विकी कौशलनं लिट्टी आणि चोखाचा घेतला आनंद : अभिनेता विकी कौशलनं स्वतः सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, यामध्ये तो पारंपारिक बिहारी जेवणाचा आस्वाद घेत आहे. विकीची अतिशय सुंदर साधी शैली अनेकांना आवडत आहे. फोटोंमध्ये, विकी एका फूड स्टॉलसमोर उभा असल्याचं दिसत आहे. याशिवाय त्याच्याभोवती काही बॉडीगार्ड उभे आहेत. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे. विकी एका फूड स्टॉलजवळ पांढरा कुर्ता-पायजमा आणि काळे चष्मा घालून उभा आहे, लिट्टी-चोखा खात आहे. दरम्यान विकीनं त्याचे फोटो शेअर करताना पोस्टवर लिहिलं, 'पटनाला आल्यानंतर मी लिट्टी-चोखा कसा चुकवू शकतो??? खूप हिट जबरदस्त. 'छावा'बद्दल रोमांचक बातमी समोर येणार आहे.' आज रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाबद्दल अपडेट येणार आहे. तसेच 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.
विकी कौशलचं वर्कफ्रंट : विकीनं पोस्ट शेअर करताच यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका व्यक्तीनं या पोस्टवर लिहिलं, 'तुम्ही ते कतरिना भाभीलाही खायला द्यायला हवे होते.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'छावा' हा चित्रपट हिट होणार आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'धन्यवाद सर, की तुम्ही माझ्या गावी आला.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं पुढं तो 'छावा' व्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटातही दिसणार आहे.या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट असणार आहेत. यापूर्वी विकीनं रणबीरबरोबर 'संजू' आणि आलियासोबत 'राजी'मध्ये दिसला आहे.
हेही वाचा :