मेष (ARIES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळं खर्च वाढेल. मोहापासून दूर राहणं योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आईची प्रकृती बिघडेल. निर्णय शक्ती डळमळीत राहिल्यामुळं द्विधा अवस्थेत अडकाल. आज कोणाला जामीन राहू नये.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज आपली प्राप्ती आणि व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय आणि मित्रांसह हसण्या-खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास-पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असं वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळं आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्याकडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. आईच्या घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकारकडून ही फायदा संभवतो.
सिंह (LEO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज आपल्या प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आजारपणामुळं दवाखान्याचा खर्च वाढेल. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या-पिण्यामुळं प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.
कन्या (VIRGO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. पती-पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान-सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संततीविषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चा किंवा वादविवाद ह्यात सहभागी न होणं हितावह राहील. शेअर-सट्टा यांचं आकर्षण हानी करेल.
धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज मन अनुत्साही असल्यामुळं मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना सावध राहावं. धनहानी आणि मानहानी संभवते. मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. छातीचे दुखणे त्रास देऊ शकते.
मकर (CAPRICORN) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावं लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. शेअर-सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल.
कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्यानं कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नकारात्मक विचार दूर करा.
मीन (PISCES) : चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट-संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. प्रवासाची शक्यता आहे. तन-मनाने प्रसन्न राहाल.
हेही वाचा -
वसंत पंचमीला आहे अद्भुत योग, 'या' मुहूर्तावर करा सरस्वतीची पूजा