क्राइस्टचर्च NZ vs ENG 1st Test : न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन दुखापतीतून सावरला आहे. तो गेल्या 2 महिन्यांपासून क्रिकेटच्या दूर होता. पण इंग्लंडविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीच्या खेळीत त्यानं असं काही वाटू दिलं नाही. किंबहुना, या वर्षीही त्यानं इंग्लंडविरुद्ध मायदेशात आपला उत्कृष्ट कसोटी विक्रम कायम राखला आहे. जसा तो दुखापतीपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. अगदी त्याच पद्धतीनं तो खेळत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 3 शतकं झळकावणारा विल्यमसन इंग्लंडविरुद्धही शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण, 7 धावांनी त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्याच्या दमदार खेळीच्या बळावर कीवी संघानं पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी 83 षटकांत 8 बाद 319 धावा केल्या.
Kane Williamson (77*) and Daryl Mitchell (16*) take the team to the break with a 63 run partnership. Follow play LIVE in NZ with TVNZ DUKE, TVNZ+, Sport Nation and The ACC. LIVE scoring | https://t.co/1bMspYPMtR #NZvENG pic.twitter.com/v69KJgOqbL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 28, 2024
विल्यमसनचं 33वं कसोटी शतक हुकलं : 93 धावांवर खेळत असताना केन विल्यमसनची विकेट इंग्लंडचा गोलंदाज ॲटकिन्सननं घेतली. म्हणजेच तो आपल्या 33व्या कसोटी शतकापासून फक्त 7 धावा दूर होता. शतक हुकल्याची खंत त्याला नक्कीच होती, पण असं असतानाही विल्यमसन क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकताना दिसला. वास्तविक, दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर राहूनही विल्यमसनच्या फलंदाजीवर त्याचा परिणाम झालेला नाही हे पाहून चाहत्यांना आनंद झाला. त्यामुळं केन विल्यमसन 93 धावांवर बाद होऊन 33वं कसोटी शतक हुकल्याची खंत असताना दुसरीकडे दुखापतीतून परतल्यानंतर दमदार खेळी खेळण्यात यश मिळाल्यानं चाहते मात्र आनंदी होते.
Day 1 ✅
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
Four wickets from Shoaib Bashir gives us a strong platform to build on in Christchurch 🙌 pic.twitter.com/AujytqJaK1
नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी : या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कीवी संघाला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अवघ्या 4 धवांवर डेव्हॉन कॉन्वे 2 धावांवर आउट झाला. मात्र यानंतर कीवी फलंदाजांनी सावध खेळ केला. संघाकडून केन विल्यमसनशिवाय कर्णधार टॉम लॅथमनं 47, ग्लेन फिलिप्सनं 41 तर रचीन रवींद्रनं 34 धावा केल्या. इंग्लंडकडून फिरकीपटू शोएब बशीरनं सर्वाधिक 4 बळी घेतले.
How good has Shoaib Bashir been today?
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
He has his fourth and Matt Henry departs for 18.
🇳🇿 2️⃣9️⃣8️⃣-8️⃣ pic.twitter.com/Xrvc6Ap148
विल्यमसन दुखापतीमुळं भारताविरुद्ध खेळला नव्हता : श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत केन विल्यमसनला दुखापत झाली होती, त्यानंतर तो ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. आता पूर्णपणे सावरल्यानंतर त्यानं इंग्लंडविरुद्ध पुनरागमन केलं आणि मालिकेतील पहिल्याच डावात आपली क्षमता दाखवून दिली.
BIG wicket! 😍
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
Kane Williamson falls in the 90s for the first time in six years, cutting straight to Zak Crawley at gully on 93
🇳🇿 2️⃣2️⃣7️⃣-5️⃣ pic.twitter.com/9ssy8xW5xz
हेही वाचा :