ETV Bharat / state

राज्यात 'इतक्या' जागा जिंकण्याचा भाजपाचा संकल्प; अमित शाहांनी घेतली भाजपा कोअर कमिटीची बैठक, महायुतीचा मेगाप्लॅन ठरला - Amit Shah Mumbai Visit

Amit Shah Mumbai Visit : दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणूक 2024 चा मेगाप्लॅन ठरवला. भाजपानं 150 जागा लढवून किमान 125 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवावं, अशा सूचना अमित शाह यांनी यावेळी दिल्या.

Amit Shah Mumbai Visit
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 10:11 AM IST

मुंबई Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. 'लालबागचा राजा' दर्शनाचं निमित्त असलं तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट फार महत्त्वाची आहे. रविवारी सायंकाळी मुंबईत आल्यानंतर अमित शाह यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांचा ताफा सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झाला. यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांनी भाजपा कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विशेष करुन सध्या राज्यातील परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी यासंदर्भात दोन तास खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत भाजपानं राज्यात 150 जागा लढवून किमान 125 जागा निवडणून आणण्याचा संकल्प केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Amit Shah Mumbai Visit
अमित शाहांनी घेतली भाजपा कोअर कमिटीची बैठक (Reporter)

बदलापूर, मालवण प्रकरणाचा घेतला आढावा : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आल्यानं राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अमित शाह यांनी रविवारी रात्री सह्याद्री अतिथिगृहावर भाजपा कोअर कमिटीची बैठक घेतली. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लाडकी बहीण योजना याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये लागलेली चढाओढ या विषयावर सर्वात प्रथम भाष्य झाल्याचं सांगितलं जात आहे. बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेलं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण तसेच मालवण इथल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली जाहीर माफी, या दोन घटनाबद्दल सध्या राज्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला.

Amit Shah Mumbai Visit
अमित शाह यांचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री (Reporter)

भाजपानं 150 जागा लढवाव्यात : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील भाजपा नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीत मतभेद झाले तरीसुद्धा महायुती अभेद्य ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सूचना सुद्धा अमित शाह यांनी दिल्या आहेत. जागा वाटपाच्या संदर्भात याप्रसंगी चर्चा करण्यात आली असून किमान 150 जागांवर भाजपानं निवडणुका लढवाव्यात आणि त्यातील 125 जागा जिंकाव्यात, अशी रणनीती आखण्यात यावी. महायुतीच्या शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 100 जागांवर विजय संपादित करावा. त्यासाठी महायुती म्हणून भाजपानं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करावं, असंही या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत ज्या काही चुका झाल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये टाळावी, याकडं कटाक्षानं लक्ष देण्याच्या सूचनाही अमित शाह यांनी केल्या. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या भाजपा कोअर कमिटीच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार पंकजा मुंडे हे नेते उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. मातृभाषेत बोललं नाही, तर कुटुंबातील संवाद संपेल; नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य करणार : अमित शाह - Amit Shah On Mother Tongue
  2. अमित शाह 'लालबागचा राजा'ही गुजरातला घेऊन जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Amit Shah
  3. गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन, राजकीय खलबतं रंगणार ? - Amit Shah Mumbai Visit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.