"तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून बघतील..." रोहित पवार यांची टीका - Rohit Pawar news - ROHIT PAWAR NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 12:26 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - "महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील. तेव्हा बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी राजे हे तिसरी आघाडी करुन भाजपाला अप्रत्यक्षपणे फायदा होईल, असे काही करणार नाहीत. हे तिन्ही नेते राज्यातील मोठे नेते आहेत. ते सुपारी घेवून काम करणार नाहीत," अस आपल्याला आज वाटतंय.'' असं वक्तव्या आमदार रोहित पवार यांनी शिर्डीत वक्तव्य केलंय.

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीतून महिला मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, " सुप्रियाताई आणि रश्मी ठाकरे या दोन्ही नेत्या सक्षम आहेत. मात्र, त्यांना विचारलं तर त्या बोलतील आज महाराष्ट्र धर्माचा लढा महत्वाचा आहे. पदाचा नाही." रोहित पवार यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला. आमदार पवार म्हणाले, " जे सत्तेत आहेत, त्या सर्व नेत्यांना खेकड्याचं का पडलंय? मला एवढंचं सांगायचं, खेड्याला ना मान नसते ना पाठीचा कणा. तुम्ही फडणवीस यांना खुश करण्यासाठी जे काय करत आहात, ते लोकांना कळतंय. त्यांना खूश करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचा विचार करा. पदासाठी तुम्ही स्वाभिमान सोडून राजु शेट्टींना सोडलं. आज सत्तेत बसला आहेत. त्यामुळे तुम्ही स्वाभिमान विषयायवर बोलण योग्य नाही," असा टोलाही रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना लागवलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.