ETV Bharat / spiritual

काय आहे महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त?; पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी दान करा - MAHASHIVRATRI VRAT 2025

'महाशिवरात्री' हा हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

Mahashivratri 2025
महाशिवरात्र 2025 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 10:46 PM IST

Mahashivratri 2025 : 'महाशिवरात्री' हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो, या दिवशी शिवलिंगात साक्षात महादेवाचा म्हणजे शिवाचा वास असतो, अशी श्रद्धा आहे. पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील चतुर्दशी तिथीला 'महाशिवरात्री' साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह (Shiv Parvati Marriage Ceremony) झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव 'महाशिवरात्री' या नावानं प्रचलित झाला आहे.

महाशिवरात्री 2025 मुहूर्त : पंचांगानुसार महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते, जे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल. तर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल, म्हणून महाशिवरात्री फक्त 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.

व्रताची पूजा करण्याची पद्धत : सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची पूजा करावी. यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभ मुहूर्तावर पूजा करावी. घरी देखील देवघर स्वच्छ करावे. मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून त्यावर बेलपत्र, आक-धतुरा, तांदूळ इत्यादी टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावं. जवळपास शिवमंदिर नसेल तर घरात मातीचे शिवलिंग बनवून पूजा करावी.

भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह : भगवान शिव आणि आदीशक्ति पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात 'महाशिवरात्री'चा सण साजरा केला जातो. भगवान शिवाला आपल्या पतीरूपात प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली होती. शिव तपस्येनं प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला, अशी श्रद्धा आहे.

‘या’ गोष्टी दान करा

-

  • तूप दान : महाशिवरात्रीला शुद्ध देशी तुप दान केल्यामुळं तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
  • पाण्याचं दान : महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्ती होते. शास्त्रांमध्ये, पाणी दान करण्याला अत्यंत शुभ मानलं आहे.
  • कपड्यांचं दान : महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दान केल्यानं महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना धन आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.
  • कच्च्या दुधाचं दान : महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चं गाईचं दूध अर्पण केल्यानं अनेक फायदे होतात. त्याचबरोबर घरात समृद्धी आणि आनंद येतो.
  • काळ्या तीळाचं दान : शास्त्रांनुसार, महाशिवरात्रीला तीळ दान केल्यानं शनिदोषही दूर होतो, कारण महादेव शनिदेवाचे गुरु आहेत.

(टीप : सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' दावा करत नाही)

हेही वाचा -

  1. महाशिवरात्री निमित्तानं भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
  2. Mahashivratri : आठ क्विंटल शेंगदाण्यापासून बनवलेले २५ फूट उंच शिवलिंग.. दर्शनासाठी भाविकांची गर्दी
  3. Mahashivratri : महाशिवरात्रीनिमित्त भारतभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, सगळीकडे बम-बम भोलेचा नाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.