thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 9:21 PM IST

ETV Bharat / Videos

देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हेंचा व्यासपीठावरून काढता पाय, नेमकं कारण काय? पाहा व्हिडिओ

पुणे Devendra Fadnavis VS Amol Kolhe :  वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आज (2 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पाडलं. मात्र, या कार्यक्रमामध्ये राजकीय नेत्यांमध्ये नाराजीनाट्याचा अंक रंगल्याचं बघायला मिळालं. झालं असं की, विकासकामांच्या भूमिपूजनानंतर तुळापूर येथे सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषणाला सुरुवात करताच शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतला. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाच्या बॅनरवर छत्रपती संभाजी महाराजांऐवजी फक्त नेत्यांचे फोटो असल्यानं तसंच कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळं कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.